Saturday, 24 June 2023

जनतेने जातीय धर्मांध विचार व प्रचार याचा संयमाने मुकाबला करावा! - *कार्यकर्ता बैठकीत आवाहन*

जनतेने जातीय धर्मांध विचार व प्रचार याचा संयमाने मुकाबला करावा! - *कार्यकर्ता बैठकीत आवाहन* 


चोपडा, प्रतिनिधी... गेल्या नऊ वर्षापासून विकासाच्या सर्व क्षेत्रात पराभूत झालेले भाजप आरएसएस चे  सरकार येत्या 2024 च्या निवडणुका जिंकण्यासाठी जनतेला जातीय दंग्याचे वणव्यात लोटून देण्यासाठी सज्ज झाले आहे. त्यासाठी सोशल मीडिया, यु ट्युब ,गोदी मीडिया, तयारीला लागले आहे. सोशल मीडियात अफवा खोटा प्रचार याला उत आलेला आहे. या भाजप सरकार आशीर्वाद प्राप्त या षड्यंत्राला  सामान्य जनतेने बळी पडू नये म्हणून सत्ताधारी पुरस्कृत जातीय प्रचार विषारी प्रचार अफवा यांचा अत्यंत संयमाने व संविधनिक  मार्गाने मुकाबला करावा.  असे आवाहन चोपडा येथे मराठा समाज सभागृहात आयोजित शहरातील सर्व थरातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आले आहे.या बैठकीला  प्रतिभाताई शिंदे, मुकुंदराव सपकाळे, श्री करिम सालार हे मान्यवर उपस्थित होते. 

बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते श्री घनश्याम भाऊ अग्रवाल हे होते. बैठकीचे प्रास्ताविक श्री राधेश्याम सर यांनी केले. त्यानंतर भारत मुक्ती मोर्चा चे संयोजक श्री काँ. मुकुंदराव सपकाळे म्हणाले की, सर्व थरातील लोक त्यात शेतकरी शेतमजूर व्यापारी मोदी सरकारवर नाराज असून त्यांची एकजूट करण्याची गरज आहे. जळगाव चे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते  श्री करीम सालार म्हणाले की, 2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले मतदान व मतदार संघ बांधणी व मतदार नोंदणीचे काम डोळ्यात तेल घालून करावे व 2024 च्या निवडणुकीत मोदी सरकारच्या पराभवासाठी सज्ज व्हावे .असे आवाहन केले व भाकप नेते काँ अमृत महाजन यांनी आपल्या भाषणात सांगितले की ,आता आपल्याला वैचारिक आणि तात्विक विचारसरणीला बांधील राहण्याची पाळी आली.. असून मोदी सरकार संविधान पायदळी तोडत आहे. विस्टा उद्घाटनाच्या वेळेला केलेल्या घटनाकार बाबासाहेबांचे नाव एकदाही  घेतले नाही असे सांगून पुरोगामी महाराष्ट्रातील जनता जातीवादाचा संयमाने मुकाबला करून तोंड देईल असा विश्वास व्यक्त केला. या प्रसंगी  डॉ चंद्रकांत बारेला, श्री जियाउद्दीन काजी यांनीही समायोजित मार्गदर्शन केले व येत्या एक-दोन जुलै रोजी महाराष्ट्र जागवा देश जागवा हे आंदोलन अभियान देशातील विविध संघटनांकडून राबवले जात असून महाराष्ट्रात त्यात जोरदार भागीदारी झाली पाहिजे.असे लोक संघर्ष मोर्चाच्या संयोजक श्रीमती प्रतिभाताई शिंदे यांनी आपली मार्गदर्शन पर भाषणात प्रतिपादन केले व अभियानाची रूपरेषा मांडली. त्यांनी असेही सांगितले की ,शेतकरी शेतमजूर कामगार वर्गसाठी या सरकारने काहीच न केल्यामुळे कर्नाटकात ज्याप्रमाणे या वर्गाने पराभव केला तसाच सडकून पराभव करण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले.

बैठकीचे संयोजक "अनेर काठ"  चे नेते श्री प्रदीप पाटील यांनी मेळाव्याच्या समारोप व आभार प्रदर्शन केले .बैठकीला सर्वश्री डॉक्टर श्री राधेश्याम पाटील, विनोद पाटील, लतिष बागुल इस्माईल तेली, चिरागोददीन दादा, जीवन बागुल, धनजय पाटील, नूर मोहम्मद एहसानली सय्यद, डॉक्टर असीम सैय्यद, आदि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते येत्या 26 जून रोजी जळगाव येथे होणारा विस्तारित प्रतिनिधी बैठकीत सर्वस्वी संतोष अहिरे जिया उद्दीन काजी शिरीष पाटील पाटील राजन पवार अशपाक पठाण ,बी. पी. महाजन सर ,आदी दहा कार्यकर्त्यांची टीम  करण्यात आली

No comments:

Post a Comment

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !!

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !! भिवंडी, प्रतिनिधी : ठाणे जिल्...