Wednesday, 26 July 2023

पाऊस आला धाऊन रस्ते गेले वाहून, बारवी धरण कधीही ओव्हर प्लो, नदी काठावरच्या गावाना सतर्कतेचा इशारा !

पाऊस आला धाऊन रस्ते गेले वाहून, बारवी धरण कधीही ओव्हर प्लो, नदी काठावरच्या गावाना सतर्कतेचा इशारा !

कल्याण, (संजय कांबळे) : उशीरा आगमन होऊनही ठाणे जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे शहरासह ग्रामीण भागाना पाणीपुरवठा करणारे उल्हास नदीवरील बारवी धरण ओव्हर प्लो होण्याच्या तयारीत आहे. असे असताना या पावसामुळे तालुक्यातील रस्ते मात्र अक्षरशः वाहून गेले आहेत. धरण भरत असल्यामुळे उल्हास नदीच्या काठावर असलेल्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

उन्हाळ्यात प्रत्येक जण उकाड्याने हैराण झाला होता. पशु पक्षी, प्राणी वरुण राजाची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र जुलैचा अर्धा महिना जवळपास कोरडाच गेला, मात्र त्यानंतर पावसाने धुमधडाक्यात सुरुवात केली.

अगदी जिल्ह्यासह कल्याण तालुक्यातील भातसा, काळू, बारवी आणि उल्हास या चारही नद्या दुथडी भरून वाहू लागल्या होत्या. यामुळे अगदी तळ गाठलेल्या बारवी धरण काल सांयकाळी पर्यंत ७०:५० टक्के भरले आहे व धरण क्षेत्रात सतत पडत असलेल्या पावसामुळे पाणी पातळीत वाढ होत आहे. बारवी धरणाला ११ वक्रव्दारे असून ते स्वयंचलित आहेत, त्याची उच्च तम विसर्ग पातळी ७२:५० आहे, पाणी पातळी ७२:६० मीटर तलाकावर गेल्यानंतर स्वयंचलित वक्रव्दारे पाणी उल्हास नदीत येवू शकते. त्यामुळे आधीच अतिवृष्टीमुळे पुरपरिस्थिती उद्भवली असून या विसर्गामुळे त्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नदीकाठच्या चांदप, चांदपपाडा, पिंपळोली, सागाव, पाटीलपाडा, पादिरपाडा,  कारंद, मो-याचा पाडा, चोण, रहाटोली आदी गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

तसेच कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर टिटवाळा, आदी ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत होवू शकते, शिवाय धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता निर्माण झाल्याने कोणी ही धबधबे, नदी किनारी, पर्यटनाला जावू नये असा इशारा ही देण्यात आला आहे.

बारवी व इतर धरणे या पावसामुळे भरली असली तरी कल्याण मुरबाड, कल्याण शहापूर, मुंबई नाशिक, कल्याण नगर, कल्याण वाशिंद, या मुख्य रस्त्यासह, मानिवली घोटसई, रायते मानिवली, रायते आपटी, मोहना टिटवाळा, वासुर्दी सांगोडे, टिटवाळा खडवली आदी अंतर्गत रस्ते अक्षरशः वाहून गेले आहेत, या रस्त्यावर प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालने असेच आहे. त्यामुळे पाण्याच्या टंचाई मुळे जीव जाणार नाही मात्र रस्त्यावरील खड्यामुळे मात्र अनेकांना जीव गमवावा लागणार आहे.

यामुळे गतीमान सरकार किती वेगवान खड्डे भरते का ते लवकर कळेल.

No comments:

Post a Comment

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे उपोषण स्थगित ; JNPA चेअरमन वाघ यांच्या आश्वासनानंतर निर्णय !!

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे उपोषण स्थगित ; JNPA चेअरमन वाघ यांच्या आश्वासनानंतर निर्णय !! उरण दि १३, (विठ्ठल ममताबादे) : जवाह...