'आपली माती आपली माणसं ' च्या पदाधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट !
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज आपली माती आपली माणसं या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्भेट घेतली. यावेळी पोलादपूर तालुका तसेच शहरातील विविध समस्या मांडल्या. यावर उपमुख्यमंत्र्यांनी सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. आपली माती आपली माणस संघटनेचे कायदेशीर सल्लागार रामशेठ रिंगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. यावेळी अजित पवार यांनी पूर्ण सहकार्य करू असे आश्वासन यावेळी दिले असे रामशेठ रिंगे यांनी सांगितले. यावेळी रामशेठ रिंगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजपा सरकारमध्ये राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी सतेत्त सहभागी झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. यावेळी लक्ष्मण पाटील, गणेश शितोळे आदी संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment