Thursday, 27 July 2023

प्रचंड पावसातही केले कुणबी समाजातील महिलांनी जोरदार आंदोलन !

प्रचंड पावसातही केले कुणबी समाजातील महिलांनी जोरदार आंदोलन !

मणिपूर येथील घृणास्पद घटनेच्या निषेधार्थ मुंबईत आक्रोश निदर्शने...

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
               मुंबईत दादर येथे मणिपूर राज्यातील महिलावरील अत्याचार विरोधात मुसळधार पावसात केले कुणबी महिला मंडळ, कुणबी युवा, बळीराज सेना यांनी आक्रोश आंदोलन. मणिपूर येथील घटना लज्जास्पद आहे, देशाची मान शरमेने खाली घालणारी आहे. पुरुषी अत्याचाराचा हा उन्माद होता, तेथील मुख्यमंत्री एन. बिरेंद्र सिंग यांना घडलेली दंगल, महिला अत्याचार बाबत काहीच वाटत नाही, केवढे हे निगरगट्ट लोक असावेत. देशाची 56 इंच छाती फुस्स झालीय, राष्ट्रपती गप्प आहेत, संसदेत विरोधकांना बोलायला देत नाहीत, सर्वत्र हुकूमशाही सुरू आहे. कुणी काहीही बोलत नाही, कुणाला काहीही पडलेलं नाही. याचा संताप आज सामान्य माणूस रस्त्यावर उतरून करीत आहे.

               महिला मग ती कोणत्याही जाती - धर्माची असो तिचा आदर सन्मान करणे हि छत्रपती शिवरायांची व शंभूरायांची शिकवण आहे. बेटी बचाव, बेटी पढाव हा नारा नावाला आहे. प्रत्यक्षात बेटी अत्याचाराने पिडीत आहे. देशात महिला, बेटी सुरक्षित नाहीत, रोज कुठे कुठे महिलांवर अत्याचार घडत आहेत. मणिपूर मध्ये नराधमांनी महिलांना नग्न करून त्याची धिंड काढून अत्याचार केले, माणुसकीला काळिमा फसला. देशात मनुस्मृती लागू झालीय की काय असे वातावरण घटना सर्वत्र सुरू आहेत. bjp - Rss सरकार, त्यांचे लोक गप्प आहेत. महिलांच्या बाबतीत ते एक शब्द बोलत नाहीत. गेले अनेक दिवस मणिपूर राज्यात मनुवादी, जातीयवादी लोकांचा हैदोस सुरू आहे, केंद्र सरकार काहीच ठोस कारवाई करित नाही.  म्हणून आता  ही लढाई प्रत्येक आईची, बहिणीची व त्या आईच्या लेकराची व बहिणीच्या भावाची आहे. आता सरकार जर न्याय करीत नसेल तर या लोकांना घालवू देण्याची वेळ आलीय. या आक्रोशाची ठिणगी आता सर्वत्र पसरली असून महिला वर्गात प्रचंड संताप आहे. या घटनेचा निषेध म्हणून बुधवारी दादर रेल्वे स्टेशन पूर्व येथे कुणबी महिला मंडळाच्या वतीने अध्यक्षा सुवर्णा सुनिल पाटील, सेक्रेटरी दिपीका आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
               यावेळी अनेक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई अंतर्गत कुणबी महिला मंडळ, कुणबी युवा मंडळ, कुणबी राजकिय संघटन समिती, विवाह सल्लागार मंडळ, सोबतच बळीराज सेना, भारतीय लोकसत्ताक संघटना, ओबीसी संघर्ष समिती यांचे प्रतिनिधी सामील होते.

No comments:

Post a Comment

वाडा तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची आमदार दौलत दरोडा यांची तातडीची सुचना !!

वाडा तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची आमदार दौलत दरोडा यांची तातडीची सुचना !! वाडा, प्रतिनिधी : वाडा तालु...