Wednesday, 26 July 2023

गोवेली ग्रामीण रुग्णालयाचे नेत्र चिकित्सक प्रदिर्घ सेवेनंतर निवृत्त, सेवापूर्ती सोहळ्यात अनेकांनी व्यक्त केली भावना !

गोवेली ग्रामीण रुग्णालयाचे नेत्र चिकित्सक प्रदिर्घ सेवेनंतर निवृत्त, सेवापूर्ती सोहळ्यात अनेकांनी व्यक्त केली भावना !

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांसाठी महत्त्वाचे ठरलेले गोवेली ग्रामीण रुग्णालयात नेत्र चिकित्सक म्हणून तब्बल १० वर्षे आणि एकूण ३२ वर्षे सेवा देणारे अनंत पांडुरंग चोळकर हे नुकतेच निवृत्त होत असून यावेळी रुग्णालयात आयोजित सेवापूर्ती सोहळ्यात वैद्यकीय अधीक्षक, पत्रकार, नर्सेस, अशा अनेकांनी श्री चोळकर यांनी केलेल्या आदर्शवत कामा विषयी आठवणी सांगितल्या.

कल्याण तालुक्यात गोवेली या मध्यवर्ती ठिकाणी १९९२ च्या आसपास ग्रामीण रुग्णालय सुरू झाले. कल्याण मुरबाड आणि कल्याण शहापूर अशा रस्त्यावर हे रुग्णालय असल्याने ते महत्त्वाचे मानले जाते. या रुग्णालयात अनेक विभागाप्रमाणेच नेत्र तपासणी हा विभाग देखिल आहे. या विभागात २००३/४ मध्ये दाखल झाल्यापासून त्यांनी माणसं जोडायला सुरुवात केली. मितभाषी, शांत, मनमिळावू स्वभाव असल्याने अगदी कमी कालावधीत त्यांनी तालुक्यातील लोकांशी सलोख्याचे संबंध निर्माण केले. २४ जून १९९१ मध्ये त्यांची पहिली पोस्टिंग पडघा प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली. त्या नंतर ठाणे सिव्हिल, गोवेली ग्रामीण रुग्णालय, बदलापूर अशा ठिकाणी काम केले, गोवेली मध्ये ते १० वर्षे काम केले. वर्षाला २५० शस्त्रक्रिया करण्याचे टार्गेट असले तरी श्री चोळकर यांचे तालुक्यात असलेले सोदार्य पुर्ण संबंध यामुळे ये सहज शक्य व्हायचे, हजोरोंना चष्मे वाटप, मोतीबिंदू आँफरेशन यामुळे कित्येकांना नवीन दृष्टी देण्यात यांचे मोलाचे योगदान आहे. 

असे अनंत चोळकर हे नुकतेच सेवानिवृत्त होत आहेत, त्या निमित्ताने गोवेली ग्रामीण रुग्णालयात सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या सहकारी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन चोळकर यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला. याप्रसंगी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधवी पंदारे म्हणाल्या, श्री चोळकर यांचे काम खूप चांगले होते, त्यांच्या कामाचा इतरांनी आदर्श घ्यायला हवा असे सांगून त्यांनी आयुष्यात, जीवनात तसेच कामात सोपान, निवृत्त, ज्ञानदेव आणि मुक्ताबाई या संताच्या नावाचा कसा उपयोग करून घेवू शकतो हे सांगितले. तसेच सुदैवाने आपल्याला आरोग्य सेवेचे काम मिळाले आहे असेही त्या म्हणाल्या,
तर पत्रकार संजय कांबळे यांनी ही नेत्र चिकित्सक अंनत चोळकर यांच्या सेवेचे कौतुक केले. या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वल जाधव, सहाय्यक अधीक्षक सुनील डोंगरे, डॉ. राजूरकर आदींनी श्री चोळकर यांच्या कामातील आठवणी ताज्या केल्या. तर यावेळी डॉ. सार्निकर, डॉ. सोनाली, गोवर्धन राठोड, सिध्देश परब आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!! मुंब...