कोळसा घोटाळ्यातील दोषींना ४ वर्षांची शिक्षा, १५ लाखांचा दंड; दिल्लीच्या विशेष न्यायालयाचा निर्णय !
भिवंडी, दिं,२६,अरुण पाटील (कोपर)
कोळसा घोटाळ्याप्रकरणी दिल्लीच्या विशेष न्यायालयाने दोषींना शिक्षा ठोठावली आहे. याप्रकरणी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक यांनाही छत्तीसगडमधील कोळसा खाणी वाटपातील अनियमिततेप्रकरणी 4 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याच प्रकरणात न्यायालयाने माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता, दोन वरिष्ठ नागरी सेवक केएस क्रोफा आणि केसी समरिया यांना 3 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा यांना ४ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय त्यांचे सुपुत्र देवेंद्र दर्डा यांनाही शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने कोळसा घोटाळ्याप्रकरणी कलम १२० बी, ४२० आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरवले.
दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू कोर्टाने दोषींना १५ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या प्रकरणातीलच आणखी एक दोषी संचालक मनोज कुमार जैस्वाल यांनाही १५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता यांना ३ वर्षांच्या शिक्षेसह १०,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याप्रकरणी सीबीआयने दोषींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती.
जेएलडी यवतमाळ यांना १९९९ ते २००५ मध्ये जुने ब्लॉक देण्यात आले होते. मात्र, याची माहिती दडवून संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात कंपनीने गैरमार्गाने कंत्राट मिळवल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे विजय दर्डा यांचे नाव यूपीए सरकारच्या काळात घडलेल्या कोळसा घोटाळ्यातही चर्चेत राहिले होते.
तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना एक पत्र लिहिले होते. त्यात दर्डा यांनी ही माहिती लपवल्याचे म्हटले होते. त्या आधारावरच ही शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणातली ही तब्बल १३ वी शिक्षा आहे. आम्हीही गेल्या नऊ वर्षांत अनेक वेदना भोगल्या. त्यामुळे आमची शिक्षा कमी करावी, असा युक्तिवाद दर्डा यांच्या वकिलांनी केला होता. मात्र, कोर्टाने त्याकडे दुर्लक्ष केले.
No comments:
Post a Comment