अंगणवाडी बालकांना किड अळी धनुर लागलेला नित्कृष्ट खाऊ..! सेविका मदतनीस यांचा एल्गार !
चोपडा, संदीप कदम.. जळगाव जिल्ह्यात अंगणवाडी मधील तीन ते सहा गटातील बालकांना अलीकडे गेल्या दोन महिन्यापासून अंगणवाडी सेविका मदतनीस यांना कोणतीही लेखी आदेश न देता केवळ तोंडी सूचनांनी खाऊ बनवण्याचे व वाटण्याचे काम सरकारने दिले आहे. सदर खाऊ साठी महाराष्ट्र राज्य कंजूमर फेडरेशन या संस्थे कडून अंगणवाडीतील लाभार्थी बालकांना हरभरा, गव्हाच्या चुरा, तांदूळ मुगाची डाळ, साखर, मीठ, हळद, चटनी अशा जिन्नसा पुरवण्यात आल्या आहेत. फेडरेशन मार्फत देण्यात आलेला जीन्नसा निकृष्ट असून खाण्यायोग्य नाहीत. तसेच बऱ्याचशा अंगणवाड्यांमध्ये खाऊ साठवण्यासाठी कोठ्या नाही,त पिण्याच्या पाण्याची पिंप नाहीत. तरीही उपलब्ध साहित्यानुसार व घरची साधने वापरून सेविका मदतनीस खाऊ तयार करणे व वाटणे काम करीत आहेत .परंतु सध्याचे पावसाचे दिवस लक्षात घेता व निकृष्ट दर्जाच्या जिन्नसा पाहता त्यात हरभऱ्यात धनुर, गव्हाच्या चूरीला जाळे अळी, निकृष्ट तांदूळ, मुगाची डाळ, भुरकट चटणी, त्यातच शिरा बनवण्यासाठी चाळीस ग्राम गव्हाच्या चुरीला आठच ग्राम साखर दिली आहे. असल्या प्रकारामुळे खाऊ बनवण्यास त्रास होतो. निसण्यातही वेळ जातो एवढे करूनही दुसऱ्या दिवशी धान्याला किड लागते. तरीही खाऊ बनवत असतात परंतु लाभार्थी देखील तो खाण्यास इच्छुक नसतात. रोजच्या या प्रकाराने त्रस्त चोपडा तालुक्यातील सेविका मदतनीस यांनी निकृष्ट खाऊचे सॅम्पल सह गाऱ्हाणे मांडण्यासाठी अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष कॉम् अमृत महाजन, सचिव ममता महाजन, तालुका अध्यक्ष वत्सला पाटील यांच्या नेतृत्वात तहसीलदार कार्यालय गाठले व सेविका मदतनीस यांनी तहसीलदार थोरात यांना निकृष्ट जिन्नसांचा सॅम्पल दाखवला. परंतु सदर सॅम्पल तुम्ही बालविकास प्रकल्प कार्यालया कार्यालयाला द्या असा सल्ला दिला. नंतर सदर निवेदनाच्या प्रती बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प एक व दोन याना देण्यात आला त्यावेळी दोन्ही कार्यालयांतर्फे श्रीमती शिरसाट व बडगे मॅडम यांनी निवेदन स्वीकारले व सॅम्पल जमा करून घेतले. त्यावेळी सेविका मदतनीसंचा भावना संतप्त होत्या. निवेदनात मागणी करण्यात आली आहे की , ताबडतोबिने दर्जेदार जिन्नसा मिळवून द्याव्यात तसेच अंगणवाड्यांना जिननसा साठवण्यासाठी कोठ्या, गॅस, पिंप जे आवश्यक असेल ते साधने उपलब्ध करून द्यावीत नाही तर याआधी सोळा वर्षे बचत गटाच्या महिलांकडे खाऊ पुरवण्याचे काम होते त्यांना ते द्यावे, या अतिरिक्त कामातून सेविका मदतनीसांची कामातून सुटका करावी तसेच अंगणवाडीतील बालकांना दर्जेदार खाऊ न मिळाल्यास येत्या नऊ ऑगस्ट रोजी जळगाव येथे जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा संघटनेचे नेते कॉम्रेड अमृत महाजन यांनी दिला आहे. निवेदन सादर करण्यासाठी चोपडा तालुक्यातून सर्व श्रीमती प्रतिभा आबाजी पाटील, कल्पना पाटील, या बाई पाटील, पुष्पावती मोरे, सुलोचना पाटील, सिंधुबाई पाटील, मिनाबाई पाटील, द्वारकाबाई पाटील, नीता पाटील, ज्योती चौधरी, शोभा डिवरे, उज्वला चौधरी, सखुबाई पाटील, यमुनाबाई सुतार, निर्मला सांगोरे, रेखा पाटील, प्रमिला पाटील, शारदा पाटील, मंगला पाटील, गीता बारेला, कविता पाटील आदी ८० सेवीका मदतनीस उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment