Thursday, 3 August 2023

माजी उप सभापती चंद्रकांत रंधा यांच्या वाढदिवसानिमित्ताने कौलाळे जि. प. शाळा मध्ये वृक्षरोपण !

माजी उप सभापती चंद्रकांत रंधा यांच्या वाढदिवसानिमित्ताने कौलाळे जि. प. शाळा मध्ये वृक्षरोपण !

जव्हार, जितेंद्र मोरघा :

जव्हार तालुक्यातील पंचायत समिती गण कौलाळे या मतदारसंघातील माजी सभापती विद्यमान पंचायत समिती सदस्य तथा शिवसेना विक्रमगड विधानसभा समन्वयक  यांच्या वाढदिवसानिमित्ताने जव्हार पंचायत समिती जव्हार कार्यालय तसेच ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय कौलाळे जिल्हा परिषद केंद्र शाळा, पवार पाडा कार्यक्षेत्रातील फणस पाडा, कौलाळे, काळशेती, पवारपाडा, कुंभारखांड, मोख्याचा पाडा या जिल्हा परिषद शाळांना भेटी देवून मुलांना मार्गदर्शन करत आपल्या ग्रामीण भागातील मुले ही खूप हुशार आहेत सगळ्यांनी मनापासून अभ्यास करून आपल्या आईवडिलांचे आणि आपल्या गावाचे किंवा समाजाचे नाव लौकिक करावे रोज शाळेत आले पाहिजे, वेळेवर परिपाठ करावा तसेच  शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी सोबत पर्यावरण पूरक साधून पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे पर्यावरणाचा नाश होवू नये या दृष्टीने सर्वांनी साधेपणाने व झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरण वाचवा अशा प्रकारे वाढदिवस साजरा करावा अशा माजी सभापती चंदकांत रंधा साहेबांच्या वाढदिवसाचा निमित्त संदेश देण्यात आला.


    जव्हार पंचायत समिती मध्ये मी विद्यमान उपसभापती असताना माझ्या कामा मध्ये पंचायत समितीचे सर्व कर्मचाऱ्यांनी  तसेच माझे सहकारी सभापती, पंचायत समिती सदस्य  माझ्या पाठीशी कायम साथ मदत केल्याबद्दल मी त्याचे मनापासून आभार मानतो.
*चंद्रकांत रंधा (माजीउप सभापती व पंचायत समिती सदस्य जव्हार )*

No comments:

Post a Comment

गेल ओम्वेट आणि भारत पाटणकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित माहितीपट 14 डिसेंबरला कोल्हापूरमध्ये प्रदर्शित !!

गेल ओम्वेट आणि भारत पाटणकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित माहितीपट 14 डिसेंबरला कोल्हापूरमध्ये प्रदर्शित !! ** Gail & Bharat (2025) दिग्दर...