Sunday 10 September 2023

डोंबिवली जवळील खिडकाळेश्वर मंदिरातून दर्शन घेऊन परत येत असताना दोन नराधमांचा अतिप्रंसगाचा प्रयत्न, पोलिसांवर हल्ला आरोपी ताब्यात !!

डोंबिवली जवळील खिडकाळेश्वर मंदिरातून दर्शन घेऊन परत येत असताना दोन नराधमांचा अतिप्रंसगाचा प्रयत्न, पोलिसांवर हल्ला आरोपी ताब्यात !!

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण डोंबिवली परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून याचा सर्वाधिक त्रास महिला, मुलींंना बसत आहे. येथे महिला सुरक्षित आहेत का असा सवाल उपस्थित करण्यात मागचे कारण म्हणजे नुकतेच डोंबिवली जवळील खिडकाळेश्वर मंदिरातून देवाचे दर्शन घेऊन घरी परत येण्यासाठी रिक्षात बसलेल्या महिलेला आधीच रिक्षात बसलेल्या रिक्षाचालकाच्या साथीदाराने व रिक्षा चालकाने सदर महिलेला धारदार शस्त्राने धाक दाखवून तिला कपडे उतरायला सांगून निर्जनस्थळी नेऊन अतिप्रंसग करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच गस्तीवर असलेल्या दोन पोलिसांनी हा प्रकार हाणून पाडला, यामध्ये या आरोपीनी पोलिसांवर हल्ला केला मात्र तरीही या जिगरबाज पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकारामुळे रात्री अपरात्री उशीरा घरी परतणाऱ्या महिलामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

कल्याण शिळफाटा मार्गाने खिडकाळेश्वर मंदिर आहे. या मंदिरात नेहमी भक्तांची मोठी गर्दी असते, कल्याण डोंबिवली परिसरातील अनेक गावातून पुरुष महिला, मुली, काँलेज तरुण तरुणी येथे येत असतात, याच रस्त्यावर अनेक लांजिग बोर्डिग आहेत, त्यामुळे या परिसरात महिला ची सुरक्षा वा-यावरच असते, येथे मोठ्या प्रमाणात नागरिककरण झाल्याने जमीनीला सोन्याचा भाव मिळत असल्याने येते गुंडगिरी, भाईगिरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, अगदी गल्ली बोळातून भाई निर्माण झाले आहेत. यांना राजकीय वरदहस्त प्राप्त झाल्याने पोलीस हतबल होतात, पर्यायाने याची गुंडगिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

डोंबिवली पुर्वेत राहणारी एक महिला रात्री ११ वाजता खिडकाळेश्वर मंदिरातून दर्शन घेऊन घरी जाण्यासाठी समोरच्या रिक्षात बसली, रिक्षात अगोदरच एक इसम बसला होता, रिक्षात बसताच मला कोळेगावात उतरा असे या महिलेने रिक्षाचालकाला सांगितले. परंतु अगोदरच बसलेल्या रिक्षाचालकाच्या साथीदाराने धारदार शस्त्र दाखवून तिला कपडे काढायला सांगितले व रिक्षा निर्जन स्थळी नेली, हा प्रकार गस्तीवर असलेल्या मानपाडा पोलीस ठाण्याच्या हवालदार अतुल भोई व सुधीर हासे यांच्या लक्षात आला, अतिप्रंसग सुरू असतानाच या दोन पोलिसांनी त्यांच्या वर झडप घातली. परंतु पोलिसांवर हल्ला करून महिलेसह परार होण्याचा प्रयत्न सुरू केला, रिक्षा जोरात पळवून रस्त्यावरच महिलेला रिक्षातून ढकलून दिले. परंतु जिगरबाज पोलिसांनी पाठलाग करून या दोघा नराधमांना ताब्यात घेतले.

हे सराईत गुन्हेगार असून त्यांची नावे प्रभाकर पाटील व वैभव तरे अशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. मानपाडा पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमातंर्गत या दोघांच्या विरोधात गुन्हे दाखल करुन त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

दरम्यान कल्याण डोंबिवली, शिळफाटा, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर आदी शहरसह ग्रामीण भागात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असून टोळीयुद्धाचा भडका उडत आहेत, यातूनच गल्ली बोळातून अगदी अल्पवयीन मुले गुन्हेगार होऊ लागली आहेत. दुर्दैवाने यांना राजकीय वरदहस्त मिळत असल्याने पोलिसांची हतबलता वाढत आहे यातूनच महिला पुरुष, मुली या सुरक्षित आहेत अशी परिस्थिती नाही.

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...