Saturday 9 September 2023

बळीराज सेनेच्या घाटकोपर विधानसभा उपाध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्हा सहसंपर्क प्रमुख पदी सत्यवान रामचंद्र शिंदे यांची नियुक्ती !!

बळीराज सेनेच्या घाटकोपर विधानसभा उपाध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्हा सहसंपर्क प्रमुख पदी सत्यवान रामचंद्र शिंदे यांची नियुक्ती !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :                
             महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या राजकीय पक्ष बळीराज सेना पक्ष अध्यक्ष तरूण तडफदार आक्रमक नेतृत्व श्री.अशोक वालम साहेब यांच्यावतीने मुंबई सह कोकण विभाग येथे अनेक पदाधिकारी जाहीर करण्यात आले.याध्ये जिल्हा- सिंधुदुर्ग, ता-वैभववाडी, नाधवडे गाव येथील मूळ रहिवाशी सद्या घाटकोपर (प.) येथे वास्तव्यास असलेले कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईचे सदस्य, सिंधुदुर्ग जिल्हा रहीवाशी सेवा संघ (रजि)चे सचिव आणि कुणबी युवा सिंधुदुर्ग जिल्हा प्रचारक काम करीत असलेले समाजसेवक श्री. सत्यवान रामचंद्र शिंदे यांची नुकतीच घाटकोपर विधानसभा उपाध्यक्ष तथा, सिंधुदुर्ग जिल्हा सहसंपर्क प्रमुख पदी नियुक्ती झाली आहे. शिंदे यांना पक्ष अध्यक्ष अशोक वालम यांच्या सहीचे नियुक्ती पत्र देण्यात आलेआहे. अनेक कार्यकर्त्यांवर जबाबदारी देऊन संपूर्ण महाराष्ट्रात व कोकणात, मुंबईसह उपनगर आगामी महानगर पालिका, जिल्ह्य परिषद, ग्रामपंचायत, लोकसभा, विधान सभा निवडणूकी करीता संघटन मजबूत करून सज्ज होण्यास आवाहन करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये २२७ वार्ड लढविण्यासाठी भविष्यात उमेदवाराची चाचपणी देखील लवकरच केली जाईल असे मुंबई उपाध्यक्ष नियुक्ती श्री.रमेश कानावले यांनी बोलताना सांगितले. संघटन कार्य जोमाने सुरू ठेवून सर्वसामान्यांचे कामे पार करण्याचे महत्त्वाची भूमिका आपण यापुढे तशीच चालत ठेवू. पक्षाने दिलेली जबाबदारी स्विकारून काम करत रहाणार अशी प्रतिक्रिया तालुसंघटन कार्य जोमाने सुरू ठेवून सर्वसामान्यांचे कामे पार करण्याचे महत्त्वाची भूमिका आपण यापुढे तशीच चालत ठेवू. पक्षाने दिलेली जबाबदारी स्विकारून काम करत राहो अशी प्रतिक्रिया घाटकोपर विधानसभा उपाध्यक्ष श्री.सत्यवान रा.शिंदे यांनी नियुक्ती पत्र स्वीकारताना मत व्यक्त केले.या नियुक्ती बद्दल कोकणातील अनेक सामाजिक संघटना, समाज शाखा, मंडळ, राजकीय मित्र मंडळी, मित्र परिवार यांनी सत्यवान शिंदे यांना अभिनंदनसह शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...