Monday, 23 October 2023

शेतकऱ्यांच्या ३५ एकर जागेवर आरक्षण ; आगासन ग्रामस्थ आक्रमक !!

शेतकऱ्यांच्या ३५ एकर जागेवर आरक्षण ; आगासन ग्रामस्थ आक्रमक !!

*न्याय भेटत नाही तोपर्यंत लढा चालूच* 

ठाणे, (शांताराम गुडेकर) :

         सरकारी मालकीचे भूखंड भूमाफियाना अनधिकृत चाळी उभारण्यासाठी आंदण देत अनेक पिढ्यांपासून जपलेल्या शेतकऱ्याच्या ३५ एकर शेतजमीनीवर आरक्षण टाकणाऱ्या ठाणे महापालिके विरोधात शेतकऱ्यांनी वज्रमुठ बांधली आहे. जवळपास ५ हजार लोकवस्तिच्या आगासन गावातील ग्रामस्थ एकवटले असून, हे आरक्षण रद्द होईपर्यंत या विरोधात लढा देण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
          ठाणे महापालिकेने विकास आरखड्यात आगासन गावातील शेतकऱ्याची ३५ एकर जमिन प्रभाग कार्यालय, हॉस्पिटल, शाळा, अग्निशमन केंद्र, पाण्याचे पंप यासह विविध विकास कामासाठी आरक्षित केली आहे. हे आरक्षण रद्द करण्याच्या मागणीसाठी आज ग्रामस्थानी निर्धार सभा घेतली. यावेळी आरक्षण रद्द होईपर्यंत लढा सुरू ठेवणार असल्याचा निर्धार केला. ग्रामस्थाच्या आंदोलनाला २७ गाव संघर्ष समितीचे गजानन पाटील, माजी नगरसेवक संतोष केणे, राजाराम पाटील  यांच्यासह अनेकांनी पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व गाव संघर्ष समितीच्या माध्यमातून स्थानिक शेतकरी उदय मुंडे आणि रोहिदास मुंडे करत आहेत.याबाबत बोलताना उदय मुंडे यांनी स्थानिक शेतकऱ्याच्या घरावर आरक्षण टाकले आहे. ज्या सुविधा स्टेशन जवळ असणे गरजेचे आहे. ते एका कोपऱ्यात खाजगी शेतजमीनीवर कशासाठी ? सरकारी जागांवर सत्ताधाऱ्याच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामे सुरू असताना आम्हाला त्रास कशासाठी? या विरोधात आमचा लढा न्याय मिळेपर्यंत चालू राहणार असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment

शाहीर जयंत चव्हाण (बापू) कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !!

शाहीर जयंत चव्हाण (बापू)  कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !! मुंबई (शांताराम गुडेकर)               बालपणापासून गायन व...