चोसाका खर्च उभारणीचा २७ कोटी आणि त्यावर १०० कोटी रुपये कर्ज? शेतकरी कामगारांच्या डोळ्यात झणझणीत अंजनच... .कॉ. अमृत महाजन
चोपडा, प्रतिनिधी.. येथील सहकारी साखर कारखाना हा संस्थापक चेअरमन स्व. धोंडू उखाजी पाटील यांनी 30-वर्षांपूर्वी अवघ्या २७ कोटी रुपयात उभारला धोंडू आप्पांच्या काळात तो चालला नंतर काही दिवसानंतर तो बंद होता.. नंतर च्या काळात खाजगी व्यवस्थापनाने चालवण्यास घेतला खाजगी व्यवस्थापन हा कारखाना भरभराटीस आणेल.. शेतकऱ्यांचे व कामगारांचे पेमेंट सुरळीत होईल अशी अपेक्षा फोल ठरली. उलट कारखान्यावर 100 कोटी रुपये कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. आणि ज्यांनी काटकसरीत कारखाना उभा केला, त्यामुळे पंतप्रधान एच डी देवेगोडा व कृषिमंत्री यांनी "कॉम्रेड चतुर आनंद मिश्रा" यांचा १९९६ मध्ये देशपातळीवर सन्मान केला, त्यांचे नाव सुद्धा कारखान्यात देण्याला देण्यात आले नाही. याला काय म्हणावे? आजमितीस ऊस उत्पादक शेतकरी यांचे फक्त साडेतीन कोटी रुपये व कामगारांचे दीड कोटी रुपये घेणेकरी आहेत, या कारखान्यातील वसाहतीत गेले ५ वर्षे वीजही नव्हती.. हे वास्तव पाहता चाळीस वर्षांपूर्वी शेती संघातील ११ लाखांच्या भ्रष्टाचाराच्या आठवणी ताज्या होत आहेत म्हणजे नाकापेक्षा मोती जड ! या म्हणीप्रमाणे कारखान्याच्या किमतीच्या चार पट कर्ज म्हणजे तालुक्यातील कारखाना उभा करणाऱ्या शेतकरी भागधारक, उस उत्पादक व चालवणाऱ्या कामगारांच्या डोळ्यात झणझणीत अंजन होय.. असे प्रतिपादन 'कामगार नेते कॉम्रेड अमृत महाजन' यांनी केले, शेतकऱ्यांच्या पेमेंट प्रश्नांवर गांधी जयंती दिनापासून आपला क्लास आंदोलन करणारे शेतकरी कृती समितीचे नेते श्री एस बी पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना व्यक्त केली यावर उपाय म्हणजे तालुक्यातील सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी कामगारांनी एकत्र येऊन प्रस्थापित याना बाजूला सारून या प्रश्नाबाबत एकत्र यावे व कारखाना पूर्ववत उभा करावा असे आवाहन त्यांनी आत्मक्लेश आंदोलनास व कामगारांचे आंदोलनास पाठिंबा देताना त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे
No comments:
Post a Comment