२१ फेब्रुवारी पासून राजभवन वर आमरण उपोषण !!
*टुरिस्ट हॉटेल प्रकरणी डॉ. माकणीकर राजभवन वर*
मुंबई, (प्रतिनिधी) : 'टुरिस्ट हॉटेल च्या अल्पवयीन वासनाकांड व अनधिकृत बांधकाम व स्टुडिओ/जमीन कब्जा प्रकरणी पोस्को अंतर्गत कारवाई होऊन हॉटेल कायमचे बंद व्हावे यासाठी विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर राजभवन येथे आमरण उपोषण करणार आहेत.
पोलिस व महापालिका वरिष्ठ अधिकारी तथा मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांना डॉ. माकणीकर यांनी टुरिस्ट हॉटेलच्या अनधिकृत बांधकाम आणि अवैध जमिनी कब्जा करून स्टुडिओ आणि अल्पवयीन मुलीचे वासनाकांड प्रकरणी निवेदन देऊन सदरची कैफियत मांडली आहे. यामुळे मंत्रालयीन आदेशाने लवकरात लवकर हॉटेल टुरिस्टचे निष्कासन होऊन मालक के अशोक राय व चालक दलाल रवी शेट्टी यांच्या कारवाईचे संकेत असल्याचे जाणवत आहेत.
महापालिका अधिकारी यात गोवले असून रवी शेट्टी याने महापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून प्रकरण दडपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. याही प्रकरणाची चौकशी वरिष्ठ स्तरावरून होणार आहे. ज्या ज्या अधिकाऱ्यांनी यात स्वतःचे हात भरून घेतले आहेत अश्यांना घरी बसण्याची वेळ आली आहे.
समाजभूषण पॅन्थर डॉ. माकणीकर म्हणाले की, यात अधिकारी संपूर्ण भ्रष्ट झाले आहेत. रवी शेट्टी या दलालाचे हॉटेल अनधिकृत असून या हॉटेल मध्ये अल्पवयीन मुलींचे वासनाकांड चालते याचा कबुली दिल्याच्या जवाबाचा आपल्या कडे विडिओ उपलब्ध असून मा. राज्यपाल महोदयांकडे तो विडिओ सुपूर्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
No comments:
Post a Comment