Friday, 2 February 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शहरप्रमुखावर पोलीस ठाण्यातच भाजपा आमदारांचा गोळीबार, कायदा सुव्यवस्थेची ऐसी की तैसी?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शहरप्रमुखावर पोलीस ठाण्यातच भाजपा आमदारांचा गोळीबार, कायदा सुव्यवस्थेची ऐसी की तैसी?

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण मधील व्दारली गावातील एका जमीनीच्या वादातून उद्भवलेली परिस्थिती मिटविण्यासाठी पोलीस ठाण्यात चर्चा सुरू असतानाच भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर चक्क पोलीस ठाण्यात हा गोळीबार झाल्याने आणि तोही सत्तेत सहभागी असलेल्या दोघामध्ये?त्यामुळे सध्या कल्याण सह राज्यात कायदा सुव्यवस्थेची ऐसी की तैसी झाल्याचे दिसून येत आहे.

सध्या राज्यात गुन्हेगारांचे उद्दात्तीकरण सुरू आहे. या गुन्हेगारी ला राजकीय आश्रय मिळत असल्याने गुन्हेगारी वाढत आहे. यातूनच कल्याण मधील प्रकार घडला आहे. कल्याण पुर्व व्दारली गावात एकनाथ जाधव व त्यांच्या कुंटूबियाची महार वतनी जमीन आहे, या जमीनीचा वाद सुरू आहे, तो वाद कोर्टात गेला, व ती केस आ.  गणपत गायकवाड यांच्या बाजूने लागली. तसा ७/१२ देखील झाला, १० वर्षापूर्वी या जमीनीचे पैसे दिल्याचे आमदार गणपती गायकवाड यांचे म्हणणे आहे. या जमीनीला कंपाऊंड यांनी घातले, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे कल्याण शहरप्रमुख व माझी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या कार्यकर्ते यांनी तोडले, या बाबतीत तक्रार करण्यासाठी आ. गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड हे हिललाईन पोलीस ठाण्यात गेले असता तेथे महेश गायकवाड, राहुल पाटील, चैनु जाधव आदी सहकारी पोहोचले, तो पर्यंत पोलीस ठाण्याच्या बाहेर शेकडो कार्यकर्ते जमा झाले होते. पोलीस ठाण्यात चर्चा सुरू असतानाच बाहेर कार्यकर्ते बाचाबाची सुरू झाली हे पाहण्यासाठी पोलीस ठाण्याचे वपोनि जगताप हे बाहेर येताच उपस्थित भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड, यांच्या वर अंधाधूद गोळीबार केला, यामध्ये त्यांच्या सह राहुल पाटील हे देखील जखमी झाले आहेत, त्यांना ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत भाजपा आमदार गणपत गायकवाड हे चँनेल ला प्रतिक्रिया देताना म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यात गुन्हेगार पैदा करत आहेत, त्यांचा मुलगा खा. श्रीकांत शिदे हे माझ्या निधीतून बांधलेल्या जागेवर स्वतः चे फलक लावत आहे, मुख्यमंत्री शिंदे यांनी माझ्याकडून करोडो रुपये घेतले आहे. त्यांनी उध्दव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली, ते भाजपाशी पण गद्दारी करणार आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा असे गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे चक्क पोलिस ठाण्यात च तेही सत्ताधारी भाजप आमदार गोळीबार करत असतील तर कायद्याचे काय? बोला, येथे तर कायद्याची ऐसी की तैसी झाली आहे. आमदार गणपत गायकवाड हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप करताहेत याचे काय? या गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांच्या सह इतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...