हरी ओम परिवाराकडून गणित व्याख्यानमालेचे आयोजन - परदेशी सर
ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पूर्व) येथील मुख्याध्यापक माननीय भिमराव परदेशी सर यांनी दिनांक 03/02/2024 रोजी ज्ञानविकास नाईट स्कूलमध्ये गणिततज्ञ गव्हाणे सर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. सदर व्याख्यानाला नाईट शाळेतील विद्यार्थी व बि.एम.सी.शाळेतील एकूण 160 विद्यार्थी हजर होते.
सदर व्याख्यानमाला विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयासाठीची असणारी भीती दूर करण्यासाठी व दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित विषयासाठी अडचण येऊ नये, भीती वाटू नये म्हणून श्री परदेशी सर व एस.एम डी.सी सदस्य सौ.दक्षा कोळी यांच्या प्रयत्नातून गणिताच्या व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. ही व्याख्यानमाला हरी ओम परीवाराच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती, गणित विषयात पास कसे व्हायचे हेच गव्हाणे सरांनी सांगितले.
ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्याकडून पुरस्कार प्राप्त गव्हाणे सरांनी मुलांची गणित विषयाची भीती घालविली यांचे सर्व श्रेय आदरणीय परदेशी सरांना व दक्षा कोळी यांना दिले पाहिजे 6:00pm ते 9:30pm पर्यंत व्याख्यान चालू होते. आपण झोपेत पाहतो ते खरे स्वप्न नसते, तर आपली झोप उडवतं, ते खरे स्वप्न असते, तशी झोप आजच्या व्याख्यानमालेने उडविली, म्हणजे गणित विषयाची भितीच दूर केली, गव्हाणे सरांनी देशातील सर्वोत्तम डोके हे सर्वात शेवटच्या बाकावर सापडतात असे डाँ. ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणायचे खरोखरच आमच्या रात्रशाळेतील मुलांना तुमची गरज होती. अतिशय सोप्या पध्दतीने गणिताची भिती विद्यार्थ्यांमधून घालवली. गव्हाणे सरांनी केलेले हे व्याख्यान 8551 वे होते.
No comments:
Post a Comment