ज्येष्ठ समाजसेवक जय नारायण उर्फ मुन्ना पंडित यांचा वाढदिवस उत्साहात साजरा...
कल्याण (अण्णापंडीत) - कल्याण मधील माजी नगरसेवक तथा ज्येष्ठ समाजसेवक जय नारायण उर्फ मुन्ना पंडित यांचा वाढदिवस कल्याण येथील जोशीबाग मधील यशोदा हॉल मध्ये हर्ष उल्हासात साजरा करण्यात आला.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त जोशी बागेत मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या आरोग्य शिबीरामध्ये शेकडो लोकांनी सहभाग नोंदवुन आरोग्य शिबीराचा लाभ घेतला. गायत्री परिवार च्या माध्यमातून जयनारायण मुन्ना पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त पंचकुंडेय गायत्री यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारच्या सत्रात गायत्री यज्ञाच्या कार्यक्रमात जवळपास 200 कुटुंबीयांनी सहभाग नोंदवुन त्यानिमित्त आयोजित भंडारा व फलाहाराचा आस्वाद उपस्थितांनी घेतला.
सायंकाळी करण पांडे आणि त्यांच्या टीमने सुंदर कांड पठणाचा कार्यक्रम घेतला. सदर सुंदर कांड पठनाचा लाभ अनेक भाविक भक्त जणांनी घेतला.सुंदर कांड पठणा निमित्त देखील सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन केले होते.
शहरातील अनेक मान्यवरांनी वरिष्ठ समाजसेवक जय नारायण पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी यशोदा हॉलमध्ये गर्दी केली होती. यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार बंधू यांनी पुष्पगुच्छ शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन जयनारायण पंडित यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यामध्ये प्रामुख्याने रामचंद्र पांडेय, बाळाराम कराळे, मुरलीधर तिवारी, नरेश पाटील, अग्रवाल कॉलेजचे चेअरमन डॉक्टर आर.बी. सिंग माजी नगरसेवक इफ्तेखार खान, जिमी मोराईस, ओम प्रकाश पांडे तथा 'नमन', वरूण पाटील, उद्योगपती श्रीचंद केसवानी, वसंत देडिया इत्यादी मान्यवरांनी त्यांचा सन्मान करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
आलेल्या सर्व प्रमुख राजकीय पक्षाचे मान्यवर नेते, समाजसेवक आणि इतर मान्यवरांचा अभिनंदन करून त्यांचे आभार सूत्रसंचालक विजयजी पंडित यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment