Sunday, 14 July 2024

मुसळधार पाऊस असतानाही 90 हून अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान !!

मुसळधार पाऊस असतानाही 90 हून अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान !!

** वैद्यकीय मदत कक्षाच्या आयोजित रक्तदान शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई (शांताराम गुडेकर) :

तीन दिवसापासून शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. रविवारी हवामान खात्याने शहरात काही ठिकाणी अतीमुसलधार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. अनेक ठिकाणी सकाळ पासून तुरळक तर काही ठिकाणी वाऱ्यासह पाऊस कोसळत होता अशा वातावरणात तसेच रविवारी सुट्टी असताना देखील मुंबईतील वैद्यकीय मदत कक्षाने दादर येथील शश्रूषा रुग्णालय येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला युवकांचा प्रतिसाद पाहायला मिळाला. वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने पहिलेच रक्तदान शिबिर पार पडले यावेळी 90 हून अधिक युवकांनी रक्तदान करत आपले समाजाप्रती असलेले ऋण व्यक्त केले. सकाळी 8 ते दुपारी 3 वाजे पर्यंत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदात्याचे मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या शिबिराला रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ रेखा भातखंडे , मुख्य मार्गदर्शक धनंजय पवार, के ई एम रुग्णालयचे सहाय्यक तेलकटवार सर, तेलकटवार मॅडम, वैद्यकीय मदत कक्षाचे अध्यक्ष कृष्णा कदम , मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, ज्ञानोबा दाभेकर, सामजिक कार्यकर्ते शिवराम उतेकर, तानाजी पवार, नरेश मोरे, विक्रांत कोसंबी , वीरेंद्र जोईल, स्वप्नील पाटिल, कोकण युवा मंच अध्यक्ष अजय यादवराव, विकास निकम, अनंत जाधव, शिवराज पार्टे, ऍड विशाल गोलांबडे आदी उपस्थित होते. वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने ग्रामीण भागातील रुग्णांसाठी शहरात तातडीने उपचार मिळावे यासाठी मदत कार्य केले जाते. दोन वर्षापूर्वी स्थापन केलेल्या या मदत कक्षाच्या सेवा कार्यात आता पर्यंत हजारहून अधिक युवक सभासद झाले असून मदत कक्षाच्या वतीने पहिले रक्तदान शिबिर दादर येथे शूश्रूषा रुग्णालय येथे आयोजित करण्यात आले होते. सकाळ पासून पाऊस असताना देखील युवक. मालाड, कांदिवली, घाटकोपर, चेंबूर, नवी मुंबई, डोंबिवली, दिवा, कल्याण येथून रक्तदान शिबिरासाठी दाखल झाले होते.

No comments:

Post a Comment

आळंदी येथील महायोगोत्सवात मुंबई जिल्हा समूहाचे रिद्मिक योगचे उत्कृष्ट सादरीकरण !!

आळंदी येथील महायोगोत्सवात मुंबई जिल्हा समूहाचे रिद्मिक योगचे उत्कृष्ट सादरीकरण !! 【 मुंबई:उदय दणदणे 】 शनिवार दिनांक १६ व १७ नोव्...