शिवसेना जिल्हाप्रमुख पदी रूचिता नाईक यांची निवड......
**शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष जिल्हाप्रमुख पदी वर्णी...
मुंबई, प्रतिनिधी, दि. ८ :- राजकारण व समाजकारण क्षेत्रात आपल्या वेगळ्या कार्यशैलीचा ठसा उमटवत कामाच्या जोरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेल्या रूचिता नाईक यांच्या कामाची दखल घेत शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने उपनेते तथा अध्यक्ष शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष अँड. अरूणजी जगताप यांच्या हस्ते बाळासाहेब भवन येथे नियुक्ती पत्र देऊन गौरविण्यात आले.
पालघर जिल्हातील दुकानदाराविरोधात नागरीकांना शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष येथे दाद मागू शकता. तुम्हाला फसविल्याचा जाब विचारू शकता आणि नुकसान भरपाई मागू शकता. त्यामुळे तक्रार करण्यासाठी तुम्हाला कुठेही प्रवास करण्याची गरज नाही. तसेच शारिरीक रुपाने त्याठिकाणी उपस्थिती नोंदविण्याची गरज नाही. या सुविधेमुळे ग्राहकाचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.
ग्राहकांची फसवणूक करणा-या कंपन्यांना धडा बसावा. त्यांनी सेवा देताना सजग रहावे यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाप्रमुख रूचिता नाईक यांनी सांगितले.
यावेळी संपर्क प्रमुख गणेश तरफे, युवा शहरप्रमुख समीर गोलांबडे, विभागप्रमुख जया गुप्ता व शिवसैनिक उपस्थित होते....
No comments:
Post a Comment