सिद्धार्थ महाविद्यालयात 'इस्त्रायलची संस्कृती, राष्ट्रभक्ती व युद्धाविषयी भूमिका' यावर कार्यशाळा संपन्न !
सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय व ज्यूइश एजन्सी ऑफ इज्राइल (Consolute General of Israil, Mumbai) यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी इज्राइल डिफेन्स सर्व्हिसेस मधील सैनिकांचे युद्धविषयक अनुभव कथन, देशाभीमान, सैनिकी प्रशिक्षण, सैन्यात दाखल होण्यासाठी लागणारी मासिकता, परराष्ट्र धोरण, समाज माध्यमे, वयाच्या १८ वर्षा नंतरचे ३ वर्ष सक्तीचे सैनिकी प्रशिक्षण या बाबत चर्चासत्र, प्रश्नमंजुषा माजी उपप्राचार्य डॉ. सुनिल कांबळे व डॉ. शशिकांत मुंढे यांच्या प्रयत्नामुळे दि. २ में, २०२५ रोजी दुपारी अस्तित्वात येऊ शकले. सिद्धार्थ महाविद्यालयाचा हा विदेशी दूतावासाबरोबरचा दुसरा संयुक्त कार्यक्रम आहे.
*जास्तीत जास्त तरुण तरुणींनी सैन्यदलात भरती होऊन देशसेवेचे व्रत स्वीकारावे हा मुख्य उद्देश समोर ठेवून सिद्धार्थ वाणिज्य व इजरायल दूतावासाने हा संयुक्त परिसंवाद आयोजित केला होता.*
*कॉन्स्युलेट सौ. नोम ओव्हना* यांनी आपल्या भाषणात भारत इज्रायल यातील सौधारयपूर्ण सांस्कृतिक संबंध यावर भाष्य केले. *'भारत माझा आवडता देश आहे*' हे आवर्जून सांगितले. *समंथा रॉबिन्सन* (डायरेक्टर ऑफ ग्लोबल पार्टनरशिप) यांनी राष्ट्रीयत्व, नागरी जागरूकता, परराष्ट्रीय धोरण या विषयावर श्रोत्यांना सजग केले. *सौ ताल मोकोव्हीटस* यांनी आपल्या युद्ध अनुभवातील दाहकता वेगवेगळ्या प्रसंग नुसार कथन केले. "नेशन फर्स्ट" हा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
तसेच दुर्दम्य इच्छाशक्ती सैनिकी प्रशिक्षण घेताना आवश्यक आहे हे ठासून सांगितले. *श्री. नोम कूपर* यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अचूक उत्तर दिली तसेच एन. डी. ए. प्रशिक्षण व इजरायली सैनिकी शिक्षण व्यवस्था यातील फरक स्पष्ट केला.
या कार्यक्रमाचे सक्रिय मार्गदर्शक *प्राचार्य प्रा. डॉ. यु. एम. मस्के* यांनी आपल्या भाषणात भारत इज्रायल मैत्री, तंत्रज्ञान, युद्धनीती या विषयावर सखोल विवेचन केले. *प्रा. डॉ. समीर ठाकूर* यांनी प्रास्ताविक केले व जागतिक घडामोडीतील भारत इज्रायल तंत्रज्ञान अदानप्रदान धोरण या विषयावर श्रोत्यांना संबोधित केले. *डॉ. शशिकांत मुंढे* हे या चर्चासत्राचे समन्वयक होते, आपल्या आभार प्रदर्शनात त्यांनी आत्मनिर्भर भारत ही संकल्पना व आंतरराष्ट्रीय सामंजस्य हे भारत - इज्रायल मैत्रीपूर्ण संबंधाचे गमक आहे हे अधोरेखित केले.
या चर्चासत्रात, पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रसायनी., अथर्व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मालाड,. रुईया कॉलेज, प्रगती कॉलेज, रॉयल कॉलेज- डोंबिवली, सिद्धार्थ वाणिज्य कॉलेज एम कॉम विभाग, सिद्धार्थ आर्ट्स कॉलेज येथून सुट्टया असताना पण ४३ मुले मुली हजर होत्या. तसेच प्रा. विशाल करंजवकर व डॉ. विष्णू भंडारे हे देखिल सहभागी झाले होते.
*-डॉ. विष्णू भंडारे (मुंबई प्रतिनिधी)*
No comments:
Post a Comment