Friday, 25 July 2025

बारवी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा !!

बारवी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा  !! 

**पाण्याच्या  पातळीत वाढ होत असताना कोणीही  नदी ओलांडू नये, किंवा अशा मार्गाने प्रवास करु नये -"एम.आय.डी.सी.प्रशासन"

मुरबाड  ( मंगल डोंगरे ) - संततधार पावसामुळे बारवी धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, औद्योगिक विकास महामंडळाने संभाव्य धोका लक्षात घेऊन, तसेच शुक्रवार दिनांक 25/07/2025 रोजीची दुपारी 3.00 वाजता ची धरणाच्या पाण्याची पातळीची पाहणी केली असता, ती 70.60 मि.मि.असुन उत्साहीत पातळी ( overflo level) 72.60 हि.मि. एवढी आहे व सद्य स्थितीत बारवी धरणातील पाणीसाठा 83.07, टक्के आहे. बारवी जल ग्रहण क्षेत्रात सततच्या पडणाऱ्या पावसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे धरणात येणारा संभाव्य येवा वाढत आहे. त्यामुळे बारावी धरणाची पातळी वाढुन बारवी धरणाचे स्वयंचलित ( वक्र द्वारे ) गेट येणाऱ्या काही दिवसांत उघडण्याची शक्यता आहे. परिणामी बारावी धरणातून बारावी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू होईल. 

तरी क्रुपया  बारावी नदीत काठच्या विशेषतः आस्नोली, चांदप, चांदप पाडा, पिंपळोली, सांगाव, पाटील पाडा, पादीर पाडा, कारंद मो-याचा पाडा, चोण, राहटोली या नदी काठावरील गावांनी तसेच इतर शहरे व शहरातील सरकारी यंत्रणा, तसेच गावातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, यांनी गावांतील नागरिकांना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असलेबाबत सतर्कतेच्या सुचना देण्याची ताकीद दिली असुन, या काळात कोणत्याही प्रकारे वाहत्या पाण्यात नागरीकांना व पर्यटकांना प्रवेश न देणे बाबत तसेच नदीच्या पात्रात पोहण्यास मज्जाव करण्यात यावा - सुचना देण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment

युवा पत्रकार मुझम्मील काझी यांना ‘कोकण रत्न पदवी’ जाहीर !!

युवा पत्रकार मुझम्मील काझी यांना ‘कोकण रत्न पदवी’ जाहीर !! ** स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांनी केली अधिकृत घोषणा  ...