Tuesday, 18 November 2025

पंचरत्न मित्र मंडळ आर.सी.एफ चेंबूर व युथ कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने चेंबूर येथे शैक्षणिक साहित्य, खाऊ वाटप !!

पंचरत्न मित्र मंडळ आर.सी.एफ चेंबूर व युथ कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने चेंबूर येथे शैक्षणिक साहित्य, खाऊ वाटप !!

शाळेसाठी कपाट, खुर्च्या, टेबल यांची दिली भेट

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
            पंचरत्न मित्र मंडळ आरसीएफ चेंबूर व युथ कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने गोवडी येथील, एम. पी. एस हिंदी शाळा येथे शैक्षणिक साहित्य वह्या वाटप तसेच शाळेसाठी कपाट, खुर्च्या टेबल व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती नजहत शेख मॅडम संचालक वित्त तसेच महाव्यवस्थापक संजय पेटकर साहेब सी. सी एन सी एस आर आर सीएफ ली डॉ.रजनीश कुमार, शाळेच्या मुख्याध्यापिका रमा सिंग मॅडम यांच्या उपस्थितीत २०० विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके,पेन, पेन्सिल पाऊच वाटप करण्यात आले तसेच ७५ मुलींना १५० सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या श्रीमती नजहत शेख मॅडम यांनी मुलांना अभ्यास करून मोठे होऊन शाळेचे नाव कमवा व शाळेतील गुरुजनांचा आत्मसन्मान वाढेल याची काळजी घ्यावी असे सूचित केले.

             समाजात विविध क्षेत्रांत लोक कल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था आहेत. या संघटना एका विशिष्ट हेतूने काम करते यातील स्वयंसेवक स्वेच्छेने व निःस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात. या संघटना प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तींत सापडलेल्यांना अनेक प्रकारे साहाय्य करतात. अन्नधान्य, कपडे, गृहोपयोगी वस्तू, औषधे, वह्या पुस्तके अशा विविध अंगांनी मदतही देतात. यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे, नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणेतसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम पंचरत्न मित्र मंडळ गेली अनेक वर्षे निस्वार्थी पणे करीत आहे. समाजाचे ऋण फेडण्यासाठी सतत अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आर.सी. एफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे अध्यक्ष अशोक भोईर, सचिव प्रदीप गावंड, खजिनदार सचिन साळूखे, उपाध्यक्ष रमेश पाटील, सहसचिव वैभव घरत, सौ. स्नेहा नानीवडेकर, सल्लागार हनुमंता चव्हाण, सदस्य नीलम गावंड आणि सर्व महिला पुरुष कार्यकर्ते, सदस्य आणि सभासद यांच्या प्रयत्नाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.
               कार्यक्रम सूत्रसंचालन स्नेहा नानिवडेकर मॅडम यांनी केले. नीलम गावंड, श्रेयस घरत (समाजसेवक), श्री वैभव घरत, मॅथ्यू डिसूझा, रमेश वामन पाटील, विलास कुंभार, सचिन साळुंखे, सचिन राखाडे, प्रशांत नागपुरे, एम कार्तिकयांन, संतोष वाणी, दिलीप येवले इत्यादींनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!! मुंब...