परिस्थितीवर मात करत सावद गावची प्रियंका जाधव बनली 'सी.ए' !!
दिव्यांग असूनही अथक प्रयत्न आणि आई-वडिलांच्या कष्टातून मिळवले यश
भिवंडी, प्रतिनिधी
भिवंडी तालुक्यातील सावद या ग्रामीण भागातील प्रियंका जिजाबाई सुरेश जाधव हिने सी.ए. (चार्टर्ड अकाउंटंट) परीक्षा उत्तीर्ण होऊन संपूर्ण तालुक्याचे नाव उज्वल केले आहे. प्रतिकूल परिस्थितीत भाजीपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आई-वडिलांची लाडकी लेक असलेल्या प्रियांकाने आपल्या मेहनतीने व चिकाटीने हे यश मिळवले आहे. दिव्यांग असलेली प्रियंका लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. दहावी आणि पदवी परीक्षेत उत्तम गुण मिळवत तिने बालपणापासून उराशी बाळगलेले ‘सी.ए. बनण्याचे’ स्वप्न अखेर सत्यात उतरवले आहे. तिचे वडील सुरेश जाधव हे गोडाऊनमध्ये साफसफाईचे काम करतात. आई शेतात भाजीपाला पिकवून व विक्री करून कुटुंबाचा सांभाळ करते. अशा कठीण परिस्थितीतही मुलीने सी.ए. परीक्षा उत्तीर्ण केल्याने संपूर्ण कुटुंबासह गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सी. ए. झाल्याबद्दल प्रियंका जाधव हिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
चौकट - (माझ्या आईने शेतात दिवसभर उन्हात काम करून, भाजीपाला विकून मला शिकवले. वडिलांनी गोडाऊनमध्ये साफसफाईचे काम करत शिक्षणासाठी पाठिंबा दिला. त्यांच्या त्यागामुळेच मला सी.ए. परीक्षेत यश मिळाले. माझा विश्वास आहे की कोणत्याही दिव्यांग व्यक्तीने स्वतःला कमी समजू नये. आपल्यातही मोठं होण्याची क्षमता, जिद्द आणि सामर्थ्य आहे.
— सी.ए. प्रियंका जाधव)
सौजन्य - मिलिंद जाधव (कवी/पत्रकार)
No comments:
Post a Comment