Tuesday, 18 November 2025

आंबेडकरी स्त्री संघटन तर्फे संविधान महोत्सव-जागृती परिषदेचे आयोजन !!

आंबेडकरी स्त्री संघटन तर्फे संविधान महोत्सव-जागृती परिषदेचे आयोजन !!

मुंबई, प्रतिनिधी 

२६ नोव्हेंबर २०२५  रोजी भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाले असून, त्यानिमित्ताने प्रत्येक नागरिकांमध्ये भारतीय संविधानाची जनजागृती व्हावी, त्या विषयी  महत्व व  संविधानाची मूल्ये कळावी. तसेच  प्रबोधन व्हावे याकरिता आंबेडकरी स्त्री संघटन' आयोजित भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तरीनिमित्त संविधान महोत्सव-जागृती परिषदेचे आयोजन २५ नोव्हेंबर २०२५ रोजी दादर, आंबेडकर भवन, येथे सकाळी १० ते सायं. ६ पर्यंत करण्यात आले आहे. सदर संविधान महोत्सव- जागृती परिषदेचेच्या  निमंत्रक आंबेडकरी स्त्री संघटन संस्थापक  प्रा. आशालता कांबळे आहेत तर उ‌द्घाटक सुप्रसिद्ध अभिनेता, कवी डॉ. मिलिंद शिंदे असून कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. प्रज्ञा दया पवार असणार आहेत. तर सदर कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी १० वाजता होणार असून, दुपारी १ ते २ वाजताच्या सुमारास संविधानमूल्याधिष्ठित सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तर दुपारी ३ ते ४.३० वाजता टॉक शो होणार असून त्यात सुनील खोब्रागडे, राही भिडे, चयनिका शाह, डॉ. कुंदा प्र. नि., हसीना खान यांचा सहभाग असणार आहे. दु. ४.३० ते सायं. समारोप, प्रमुख वक्ते म्हणून लेखक, वैदयकिय संशोधक, सामाजिक विचारवंत प्रा. डॉ. राम पुनियानी असणार आहेत. ६ पर्यंत  परिषदेचा समारोप  होणार आहे. तर आंबेडकरी स्त्री संघटनच्या नंदा कांबळे, पुष्पा धाकतोडे, शिरीन लोखंडे, डॉ. प्रज्ञा दया पवार, छाया खोब्रागडे, डॉ. निशा शेंडे, श्यामल गरुड, शारदा नवले, छाया कोरेगावकर, सुरेखा पैठणे, माधुरी शिंदे, वैभवी अडसूळ, मयुरा सावी सहभागी असणार आहेत. सदर कार्यक्रमासाठी सर्वांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आंबेडकरी स्त्री संघटन यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सौजन्य - मिलिंद जाधव (कवी/पत्रकार)

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...