नागरी संरक्षण दलाचे कार्यालय, कल्याण (प.) पाच दिवसीय बेसिक प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ !!
कल्याण, ता. १७ : नागरी संरक्षण दलाचे कार्यालय, कल्याण (प.) येथे २६ प्रशिक्षणार्थ्यांसाठी आयोजित ५ दिवशीय बेसिक प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ आज उत्साहात झाला. प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवसाचे उद्घाटन नागरी संरक्षण दल नवी मुंबई समुह, ठाणेचे प्रमुख मा. विजय जाधव, उपनियंञक, नागरी संरक्षण, नवीमुंबई समुह, ठाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी कोर्स प्रभारी श्रीम. दिपाली दौ.घरत, सहाय्यक उपनियंञक यांनी शासनाने निर्धारित केल्यानुसार प्रशिक्षण दिले जाईल. ज्यामध्ये प्रामुख्याने प्रात्यक्षिकांसह सराव करवुन घेण्याची ग्वाही दिली.
तसेच विभागातील इतर उप मुख्य क्षेञरक्षक, क्षेञ-१, ठाणेचे श्री.बिमल नथवाणी व उप मुख्य क्षेञरक्षक, व क्षेञ-३, उलाहासनगर,अंबरनाथ बदलापुरचे श्री.कमलेश श्रीवास्तव या मान्यवरांनीही उपस्थित राहून प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले.
उद्घाटनपर भाषणात मा. जाधव साहेबांनी नागरी संरक्षण दलाच्या प्रशिक्षणाचे महत्त्व, आपत्ती काळातील सज्जता, तसेच प्रत्येक नागरिकाने अशा प्रशिक्षणाद्वारे समाजासाठी कसे योगदान देऊ शकतो याबाबत सविस्तर माहिती दिली. याचबरोबर पुढील दिवसांमध्ये प्रशिक्षण कशाप्रकारे टप्प्याटप्प्याने पार पाडले जाणार आहे, याचीही माहिती त्यांनी दिली.
आजच्या पहिल्या सत्रामध्ये शकुंतला राय मॅडम, विभागीय क्षेञरक्षक तथा मानसेवी निदेशक, कल्याण (प.) विभाग यांनी प्रथमोपचार (First Aid) या विषयावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले. जखमी व्यक्तीला मदत करताना कशी व कोणती खबरदारी घ्यावी, प्राथमिक उपचारांची योग्य पद्धत, तसेच आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ करावयाची कृती याचे मार्गदर्शन त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना दिले.
पहिला दिवस अत्यंत शिस्तबद्ध व माहितीपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
Civil Defence Corps
ReplyDelete