Monday, 19 January 2026

गोशिनरियु कराटेचे सुयश !!

गोशिनरियु कराटेचे सुयश !!

उरण दि १९, (विठ्ठल ममताबादे) :
अलिबाग येथे २६ वी शितोरियू कराटे डो असोसिएशनची ऑल इंडिया ओपन चॅम्पियन कराटे स्पर्धा संपन्न झाली. त्यामध्ये विविध वयोगटांमध्ये गोशीन रियु कराटे असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी विविध वयोगटात सहभाग घेऊन चमकदार कामगिरी केली.मनस्वी हिराचंद ठाकूर दोन गोल्ड मेडल, स्वरा राकेश म्हात्रे एक गोल्ड मेडल एक सिल्वर मेडल, वेदा नवनीत पाटील एक ब्रॉन्झ मेडल, श्रुजा संजीत गावं एक ब्रॉन्झ मेडल, साक्षी संदेश पाटील एक ब्रांझ मेडल, अमिषा अरुण घरत ब्रांझ मेडल अशी पदके पटकाविली.या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातून साडेनऊशे विद्यार्थी सहभागी झाले होते.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सिहान राजू कोळी, ( इंडिया प्रेसिडेंट गोशीन रियु कराटे ), गोपाळ म्हात्रे, परेश पावस्कर, अमिषा खरात, राकेश म्हात्रे, भूषण म्हात्रे यांनी केले. ही स्पर्धा सिहान राहुल तावडे, रागिनी तावडे यांनी भरविली होती.

No comments:

Post a Comment

नवघर ग्रामपंचायत हद्दीतील गावांना भेडसावणा-या समस्यांविषयी सिडको अधिका-यां समवेत ग्रामस्थांची बैठक संपन्न !!

नवघर ग्रामपंचायत हद्दीतील गावांना भेडसावणा-या समस्यांविषयी सिडको अधिका-यां समवेत ग्रामस्थांची बैठक संपन्न !! उरण दि १८ (विठ्ठल म...