Friday, 6 March 2026

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व - श्रीमती ज्योती ज्ञानेश्वर पाटील

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व - श्रीमती ज्योती ज्ञानेश्वर पाटील.

श्रीमती ज्योती ज्ञानेश्वर पाटील यांचे शिक्षण डी.एड., बी.ए., बी.एड., डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट असे असून २०१३ पासून त्या जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट( नेटिव्ह इन्स्टिटयूट) च्या इंग्लिश मिडीयम मध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत व २०२० पासून  प्राथमिक इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ज्योती पाटील यांनी आपल्या कार्यातून नेतृत्व, कर्तृत्व व प्रभावी वक्तृत्वाची उज्ज्वल परंपरा जोपासली आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना ज्ञानरूपी दागिन्यांप्रमाणे पैलू पाडण्याचे कार्य आजपर्यंत त्यांनी अत्यंत एकनिष्ठेने केले आहे.ज्योती पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वात शिस्त, संवेदनशीलता, दूरदृष्टी आणि कार्यतत्परता यांचा सुंदर संगम दिसून येतो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या केवळ शिक्षणच देत नाही, तर संस्कार, मूल्ये आणि आत्मविश्वासही देत असतात.

 बुद्धिचातुर्य, अचूक निर्णयक्षमता आणि व्यवस्थापन कौशल्य यांमुळे ज्योती पाटील या अध्यापन क्षेत्रात उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करत आहेत . कठीण परिस्थितीतही शांतपणे योग्य निर्णय घेण्याची त्यांची क्षमता सर्वांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.ज्ञानसागरात मुक्त विहार करणाऱ्या राजहंसांना ज्ञानरूपी अमृतकण पोहोचविणाऱ्या ज्योती पाटील यांना सन २०२३-२४ चा संस्थेचा के. श्री. दादासाहेब तात्याबा सातपुते स्मृती पुरस्कार तसेच श्री. ज्ञानेश्वर तुकाराम मेटकरी पुरस्कृत आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.ज्योती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावत असून विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, स्पर्धात्मकता आणि नैतिक मूल्यांची जोपासना होत आहे. सामाजिक क्षेत्रातून शाळेसाठी उपयुक्त शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न ज्योती पाटील करत आहेत.ज्योती पाटील यांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे शिक्षकवर्गात उत्साह, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि पालकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. त्यांच्या कार्यामुळे संस्थेचे नाव देखील उज्ज्वल झाले आहे.शिक्षण क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्या सर्वांना सुपरिचित आहेत.


शब्दांकन - लेखन - विठ्ठल ममताबादे, उरण

No comments:

Post a Comment

विरारच्या उत्कर्ष विद्यालयात दुमदुमला मराठी भाषेचा जागर !!

विरारच्या उत्कर्ष विद्यालयात दुमदुमला मराठी भाषेचा जागर !! विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण 'भाषा हे संस्कृतीचे बलस्थान असतं...