रायगडमधील साहित्यिकांची आषाढीला साहित्य वारी निघते हा रायगडाचा अभिमान..!
ॲड.गोपाळ शेळके
उरण दि १९, (विठ्ठल ममताबादे) : रायगडमधील साहित्यिकांची आषाढीला साहित्य वारी निघते हा रायगडाचा अभिमान असे मत ॲड.गोपाळ शेळके यांनी व्यक्त केले.उरण रायगड येथून कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) साहित्यिकांची पंढरपुरला आषाढी वारी १८ जुलै रोजी उरण तालुक्यातील नवघर येथून निघाली.या वर्षीची ही परिषदेची १६ वी वारी. मधुबन कट्ट्याचे अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे यांनी श्रीफळ वाढवून प्रस्थानास सुरुवात केली. कोमसाप विश्वस्त साहित्यरत्न प्रा. एल बी पाटील यांच्या मार्गदर्शनात ही वारी निघत असते.
शाखेचे अध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे, बाल विभाग प्रमुख संजीव पाटील, जिल्हा सचिव संजय होळकर, रामसुनील म्हात्रे,नाटककार किशोर पाटील, कवी नरेश पाटील, महेंद्र गावंड, किशोर म्हात्रे, नाटककार भारत पाटील, संजय पाटील, जान्हवी गंधार, अर्चना विनय, सरिता सुनील ,उज्ज्वला देविदास, या अठ्ठावीस बंधुभगिनीनी विठुरायाच्या गजरात दिडीची सुरुवात केली.
विश्रांतीच्या पाहिलं टप्प्यात नढाळ मंदिरात शांताराम देशमुख,गोपाळ शेळके,दत्ताराम शेळके शेळके आपत्ती निवारण प्रसिद्ध जयपाल पाटील ,निखिल देश मुख,इत्यादींनी वारकऱ्यांचे स्वागत केले. पंढरीत साहित्यरत्न रायगडभूषण प्रा. एल. बी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन घेण्यात आले .त्या वेळी मच्छिंद्र म्हात्रे, रामचंद्र म्हात्रे, रायगड भूषण किशोर पाटील. नरेश पाटील, संजय होळकर, रमण पंडित, संजय पाटील, किशोर म्हात्रे, महेंद्र गावंड यांनी संजीव पाटील यांच्या सूत्रसंचालनात सुरेख कविसंमेलन संपन्न झाले
No comments:
Post a Comment