Monday, 20 July 2026

इतर मागासवर्गीयांसाठी स्वयंरोजगार व उच्च शिक्षणासाठी विविध कर्ज योजना; ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन !!

इतर मागासवर्गीयांसाठी स्वयंरोजगार व उच्च शिक्षणासाठी विविध कर्ज योजना; ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन !!

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत इतर मागासवर्गीय प्रवर्गातील पात्र नागरिकांना स्वयंरोजगार, उद्योग व्यवसाय आणि उच्च शिक्षणासाठी विविध कर्ज व व्याज परतावा योजनांचा लाभ उपलब्ध करून दिला जात आहे. पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (१५ लाख रुपयांपर्यंत), गट कर्ज व्याज परतावा योजना (१० ते ५० लाख रुपये), महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना (५ ते १० लाख रुपये), शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना (देशांतर्गत १० लाख व परदेशी शिक्षणासाठी २० लाख रुपये) तसेच १ लाख रुपयांपर्यंतची थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे.

पात्र लाभार्थ्यांनी बँकांकडून मंजूर झालेल्या कर्जावरील व्याज परतावा योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इच्छुकांनी www.msobcfdc.org⁠ या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा.

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी, येरवडा, पुणे येथे अथवा दूरध्वनी क्रमांक ०२०-२९५२३०५९ वर संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

रायगडमधील साहित्यिकांची आषाढीला साहित्य वारी निघते हा रायगडाचा अभिमान..!ॲड.गोपाळ शेळके

रायगडमधील साहित्यिकांची  आषाढीला साहित्य वारी निघते हा रायगडाचा अभिमान..! ॲड.गोपाळ शेळके  उरण दि १९, (विठ्ठल ममताबादे) : रायगडमध...