पक्षी विज्ञान आणि चिमणी संवर्धन कृती या विषयावर जनजागृती !!
उरण दि ३, (विठ्ठल ममताबादे) : राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्ताने मॉडर्न स्कूल आणि ज्यु.कॉलेज, वाशी येथे " पक्षी विज्ञान आणि चिमणी संवर्धन कृती " या विषयावर फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन ) सर्पमित्र निसर्गसंवर्धन संस्था चिरनेर उरण रायगड महाराष्ट्र तर्फे संस्थेचे सदस्य निकेतन रमेश ठाकूर यांनी उपस्थित ३५० विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासमोर व्याख्यान व चिमणी संवर्धन कृती म्हणून टाकाऊ वस्तूंच्या पासून चिमण्यांची घरटी बनविण्याचा उपक्रम घेण्यात आला. टाकाऊ रोल्स, पुठ्ठे यांचा वापर करून एकूण ७५ घरटी ह्या उपक्रमातून विद्यार्थ्यांकडून बनविण्यात आली व ती त्याच विद्यार्थ्यांना भेट म्हणून देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या सुमित्रा भोसले , शिक्षक तुषार म्हात्रे, विलास कुडावकर , शिक्षिका रिया ठाकूर व शिक्षकेतर कर्मचारी वृंदांचे मोलाचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment