Monday, 2 March 2026

कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यान व्यायाम समितीच्या वतीने होळी पौर्णिमेनिमित्त धुळीवंदन कार्यक्रम उत्साहात संपन्न....

कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यान व्यायाम समितीच्या वतीने होळी पौर्णिमेनिमित्त धुळीवंदन कार्यक्रम उत्साहात संपन्न....

पवित्र होळी पौर्णिमेनिमित्त डोंबिवली पूर्व विभागातील सुनील नगर येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यान येथे आज मंगळवार दिनांक ३ मार्च २०२६ रोजी सकाळी ठीक ८.०० वाजता कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यान व्यायाम समितीच्या वतीने धुळीवंदन कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदात संपन्न झाला.

सदर कार्यक्रमामध्ये व्यायाम समितीच्या ९० पेक्षा अधिक महिला व पुरुष सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने करण्यात आली.

यावेळी समिती सदस्य श्री. कृष्णा सोमरडे सर यांनी होळीच्या निमित्ताने पुरातन काळातील विविध आख्यायिका सांगत उपस्थितांचे मार्गदर्शन करून सर्वांची लक्ष वेधले. त्यांनी भविष्यात होळी पौर्णिमेच्या दिवशी झाडांची कत्तल करून लाकडे जाळण्याऐवजी आपल्या परिसरातील वृक्षांची पूजा करून पर्यावरणपूरक होळी साजरी करावी, तसेच रासायनिक रंगांऐवजी फुलांच्या पाकळ्यांद्वारे धुळीवंदन व रंगपंचमी साजरी करण्याचे आवाहन केले. यवतमाळ येथे याबाबत जनजागृती करणाऱ्या संस्थेच्या कार्याची माहितीही त्यांनी आपल्या भाषणात दिली.

नांदिवली गावचे ग्रामस्थ व उद्योजक श्री. संजय शेठ म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त समितीच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमाला माजी नगरसेवक श्री. प्रकाश शांताराम माने, श्री. विक्रम बाळकृष्ण म्हात्रे, संगम सावता भुजबळ, अजित कुमार दामले, विलास सावंत, शरद जोशी, देविदास चावडा, श्रीमन हेडा, संदीप शेट्टी, फुलचंद माळी, नरेशजी भावसार, प्रकाश गाढवे, यल्लाप्पा इटागी, चिंतामण गोपाळ भडसावळे, माधव थिटे, घनःश्याम मालवी, सौ. सानिका गंधे, विकास परशुराम म्हात्रे, रमेश मोमय्या, सुरेश भुवड, हेमंत बारस्कर, प्रमोद शेटे, अनंत दत्तू पाटील, सौ लता अनंत पाटील, तुकाराम येवले, सौ माधुरी मधुकर जोशी, सुनीती पाचेरकर, सुरेश देशपांडे, श्वेता एच के, आनंदा नेने, सचिन विरनोडकर, हेमलता चौधरी, सौ. प्रतीक्षा माने, अंकुश पाटील, सु. कृ. भातखंडे, शरद जोशी, शंकर शिरोळकर, जनार्दन सरोदे, सुरेश रातवडकर, शांता भंडारी, नंदा शालिग्राम, मेघा ठोंबरे, मनीषा परब सीताराम राऊत शशिकांत पारकर आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणारी सहा वर्षाची भक्ती संजय म्हात्रे यांच्यासह इतर व्यायाम समितीचे ९० पेक्षा जास्त मान्यवर सदस्य उपस्थित होते.

सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रदीप सुधाकर पवार, विक्रम बाळकृष्ण म्हात्रे, विकास परशुराम म्हात्रे, सार्थक चव्हाण, व संगम सावता भुजबळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माजी नगरसेवक तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेबांच्या कार्यालयाचे प्रतिनिधी श्री. प्रकाश शांताराम माने यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
डोंबिवली शहरामध्ये वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक व आरोग्यविषयक उपक्रम राबवून महत्त्वाचे सण व दिवस उत्साहात साजरे करण्यामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यान व्यायाम समिती नेहमीच अग्रेसर असल्याचे या कार्यक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

सौजन्य - मा. नगरसेवक, प्रशांत शांताराम माने 

No comments:

Post a Comment

पंचरत्न मित्र मंडळ (रजि.),आर. सी. एफ तर्फे ओम साई मित्र मंडळ, साईधाम शिवाजीनगर शिवदर्शन गृ.स.सं. मर्या.) वाशी नाका चेंबूर येथे आरोग्य शिबीर संपन्न !!

पंचरत्न मित्र मंडळ (रजि.),आर. सी. एफ तर्फे ओम साई मित्र मंडळ, साईधाम शिवाजीनगर शिवदर्शन गृ.स.सं. मर्या.) वाशी नाका चेंबूर येथे आरोग्य शिबीर ...