Monday, 2 March 2026

प्रा. डॉ. शंकर पुजारी यांनी Ph.D. पदवी संपादन केल्याबद्दल सत्कार !!

प्रा. डॉ. शंकर पुजारी यांनी  Ph.D. पदवी संपादन केल्याबद्दल सत्कार !!
इयत्ता दहावी बॅचच्या वतीने आपल्या वर्गमित्र प्रा. डॉ. शंकर पुजारी यांना कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग या अद्ययावत तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये Ph.D. पदवी संपादन केल्याबद्दल फेटा, शाल व सन्मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी उपस्थित सर्व वर्ग मित्रांनी डॉ. शंकर पुजारी यांच्या पीएच.डी. पर्यंतच्या प्रेरणादायी शैक्षणिक प्रवासाचे मनःपूर्वक कौतुक केले. विविध सांस्कृतिक व आठवणींना उजाळा देणारे कार्यक्रम आयोजित करून जुन्या आठवणींना नवसंजीवनी देण्यात आली.सत्काराला उत्तर देताना डॉ. शंकर पुजारी यांनी आपल्या यशामागे सर्व वर्गमित्र-मैत्रिणींचा मोठा वाटा असल्याचे नमूद केले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रोत्साहन व सहकार्यामुळेच हा शैक्षणिक टप्पा गाठता आला, असे त्यांनी कृतज्ञतापूर्वक सांगितले. तसेच, सर्व वर्गमित्रांचे वाढदिवस एकत्र येऊन साजरे करण्याची सुंदर परंपरा जपल्याबद्दल त्यांनी सर्वांचे विशेष कौतुक केले.याच प्रसंगी कराड येथील PWD विभागातील अभियंता श्री. सुरेश गायकवाड यांचा वाढदिवसही सर्वांनी उत्साहात साजरा करून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

हा स्नेहमेळावा मैत्री, कृतज्ञता आणि अभिमान यांचा सुंदर संगम ठरला.

सौजन्य/वृत्त - विलासराव कोळेकर सर 

No comments:

Post a Comment

कल्याण पंचायत समितीत बायोमेट्रिक हजेरी सक्तीची – गैरहजेरी व गैरवापरावर कडक कारवाईचे आदेश !!

कल्याण पंचायत समितीत बायोमेट्रिक हजेरी सक्तीची – गैरहजेरी व गैरवापरावर कडक कारवाईचे आदेश !! कल्याण, प्रतिनिधी  : सामाजिक कार्यकर...