WeRmore Solutions Private Limited चा ६ वा वर्धापनदिन उत्साहात; मानसी पत्याणे पहिल्या ‘करोडपती लीडर’ !!
मुंबई (शांताराम गुडेकर )
WeRmore Solutions Private Limited कंपनीचा ६ वा वर्धापनदिन सोहळा २२ फेब्रुवारी २०२६ रोजी वाशी येथील CIDCO Exhibition Centre येथे दिमाखात पार पडला. देशभरातून ५००० हून अधिक सभासद या भव्य कार्यक्रमास उपस्थित होते. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे विरारच्या सौ. मानसी पत्याणे यांचा कंपनीच्या पहिल्या ‘करोडपती लीडर’ म्हणून झालेला विशेष सन्मान. कार्यक्रमाला मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते संतोष जुवेकर तसेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात यांच्या उपस्थितीने रंगत वाढली. कंपनीचे सीएमडी विकास गोपाळ व एमडी प्रिया कड यांच्या हस्ते मानसी पत्याणे यांना गौरविण्यात आले.
केवळ तीन वर्षांत हे यश संपादन करणाऱ्या मानसी पत्याणे यांनी महिलांनी आर्थिक स्वावलंबनासाठी डायरेक्ट मार्केटिंग क्षेत्रातील संधी ओळखून पुढे यावे, असे आवाहन केले. ‘टीम विनर्स’मधील १५०० हून अधिक सभासद उपस्थित होते. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ५० लीडर्सचा सन्मान करण्यात आला, तर लकी ड्रॉमध्ये ५३० पेक्षा अधिक सदस्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
No comments:
Post a Comment