Monday, 2 March 2026

एम. एम. पवार यांना राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित !!

एम. एम. पवार यांना राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित !!

भिवंडी प्रतिनिधी, (मिलिंद जाधव) :

जप जीवाला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विद्या मंदिर, मांडा-टिटवाळा येथील सहाय्यक शिक्षक एम. एम. पवार यांना नुकतेच राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील २५ वर्षांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

एम. एम. पवार हे गेली पावशतक विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य करीत असून ते सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत. त्यांच्या अध्यापनातून शाळा, गाव आणि देशाचे भविष्य घडविणारी गुणवंत पिढी तयार होत असल्याचे मान्यवरांनी गौरवोद्गार काढले. त्यांच्या आदर्श कार्यामुळे राष्ट्रउभारणीला शाश्वत बळ मिळत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

संस्थेचे अध्यक्ष एन. ए. कदम, सचिव तुकाराम मोंडकर, निवड समिती अध्यक्ष किसन बोंद्रे तसेच उपाध्यक्षा करुणा बांगर यांच्या हस्ते पवार यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या सन्मानाबद्दल एम. एम. पवार यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

पनवेल तालुक्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती !!

पनवेल तालुक्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती !! ** नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव. उरण दि २२, (व...