Sunday, 1 March 2026

श्री सदस्यांनी स्वच्छता अभियानाद्वारे केली साफसफाई !!

श्री सदस्यांनी स्वच्छता अभियानाद्वारे केली साफसफाई !!

** ओला कचरा-१३.९ टन, / सुका कचरा-१९.७५१ टन गोळा

उरण दि १(विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिना प्रित्यर्थ उरण शहर व परिसरात डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पद्मभूषण डॉ श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली १ मार्च २०२६ रोजी सकाळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेत १५७७ श्री सदस्यांनी सहभाग घेतला. 

या स्वच्छता मोहिमेत ओला कचरा-१३.९ टन,सुका कचरा-१९.७५१टन गोळा करण्यात आला.स्वच्छते विषयी समाजात, जनतेत जनजागृती व्हावी, आपले शहर स्वच्छ सुंदर व निरोगी राहावे या अनुषंगाने उरण शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पद्मभूषण डॉ श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी स्वच्छता अभियानाचे आयोजन केले जाते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी राबविलेल्या स्वच्छता अभियानाला जनतेचा, नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. या मोहिमेत उरणच्या नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर यांनी सहभागी होऊन स्वच्छता अभियानात भाग घेतला

No comments:

Post a Comment

WeRmore Solutions Private Limited चा ६ वा वर्धापनदिन उत्साहात; मानसी पत्याणे पहिल्या ‘करोडपती लीडर’ !!

WeRmore Solutions Private Limited चा ६ वा वर्धापनदिन उत्साहात; मानसी पत्याणे पहिल्या ‘करोडपती लीडर’ !!  मुंबई (शांताराम गुडेकर )...