Friday, 24 April 2026

उरण नगरपरिषदेतर्फे लाल मैदानावर धडक स्वच्छता मोहीम; नगराध्यक्षांनी स्वतः चालवला बुलडोझर !!

उरण नगरपरिषदेतर्फे लाल मैदानावर धडक स्वच्छता मोहीम; नगराध्यक्षांनी स्वतः चालवला बुलडोझर !!

​उरण  दि २४, (विठ्ठल ममताबादे) : ​उरण शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आणि नागरिकांना स्वच्छ व सुसज्ज क्रीडांगण उपलब्ध करून देण्यासाठी उरण नगरपरिषदेच्या वतीने  स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान (लाल मैदान) येथे विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे नगराध्यक्षा श्रीमती भावना घाणेकर यांनी स्वतः बुलडोझर चालवून या मोहिमेचे नेतृत्व केले आणि स्वच्छतेचा नवा आदर्श घालून दिला.​मैदानाची दुरवस्था आणि वाढलेला कचरा लक्षात घेता, नगरपरिषदेने  सकाळपासूनच ही व्यापक मोहीम हाती घेतली. सफाई कामगारांच्या खांद्याला खांदा लावून नगराध्यक्षांनी कामात सहभाग घेतला. मैदानाची व्याप्ती मोठी असल्याने नगरपरिषदेच्या नियमित कर्मचाऱ्यांसोबतच अतिरिक्त मनुष्यबळ आणि आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. यामुळे मैदानातील कचरा आणि झाडेझुडपे काढण्याचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे.​याप्रसंगी बोलताना नगराध्यक्षा भावना घाणेकर म्हणाल्या की, "सावरकर मैदान हे आपल्या शहराचे वैभव असून ते स्वच्छ ठेवणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. ही मोहीम केवळ आजपुरती मर्यादित नसून, शहर स्वच्छतेचा हा संकल्प पुढेही असाच सुरू राहील."
​उरण नगरपरिषदेने या मोहिमेच्या माध्यमातून 'स्वच्छ उरण, सुंदर उरण' असा संदेश दिला आहे. मैदानावर कचरा न टाकता त्याचे पावित्र्य राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले असून, आगामी काळात शहरातील इतर सार्वजनिक ठिकाणीही अशाच मोहिमा राबवल्या जाणार आहेत.

​"चला, आपले मैदान स्वच्छ ठेवण्यासाठी आणि उरणच्या वैभवात भर घालण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊया!"अशी साद नागरिकांना नगराध्यक्ष भावना घाणेकर यांनी घातली आहे

No comments:

Post a Comment

समाधान म्हात्रे यांच्या वाढदिवसा निमित्त गोर गरिबांना शैक्षणिक व आर्थिक मदत !!

समाधान म्हात्रे यांच्या वाढदिवसा निमित्त गोर गरिबांना शैक्षणिक व आर्थिक मदत !! उरण दि २५, (विठ्ठल ममताबादे) : राष्ट्रवादी काँग्र...