कोपरखैरणे, नवीमुंबई येथे नागरी संरक्षण दलाची भव्य हवाई हल्ला व ब्लॅकआऊट मॉकड्रील यशस्वी !!
** उपशीर्षक : ४ हजारांहून अधिक नागरिक, विद्यार्थी आणि विविध विभागांचा उत्स्फूर्त सहभाग
नवी मुंबई, दि. ९ एप्रिल २०२६ : मा. महासंचालक, नवी दिल्ली तसेच नागरी संरक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह, ठाणे कार्यालयामार्फत मा. उपनियंत्रक, नागरी संरक्षण यांच्या मार्गदर्शनाने व नेतृत्वाखाली गुरुवार, दि. ९ एप्रिल २०२६ रोजी सायं. ४.०० वाजता माजी सरपंच स्व. गणपतशेठ फकीरजी नाईक मैदान, बोनकोडे गांव, सेक्टर-११, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे हवाई हल्ला आणि ब्लॅकआऊट मॉकड्रीलचे भव्य आयोजन करण्यात आले.
या मॉकड्रीलला मा. आमदार संजय केळकर, मुख्य क्षेत्ररक्षक, नागरी संरक्षण, नवीमुंबई समुह, ठाणे तसेच स्थानिक नगरसेविका श्रीमती भारती पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी नागरी संरक्षण दलाने हवाई हल्ला प्रतिसाद, प्रथमोपचार, अग्निशमन, विमोचन, हायराईज रेस्क्यू यांसारख्या विविध आपत्कालीन प्रात्यक्षिकांचे प्रभावी सादरीकरण केले. यासोबतच ब्लॅकआऊटचीही यशस्वी कवायत घेण्यात आली.
सदर उपक्रमात नागरी संरक्षण स्वयंसेवक व मानसेवी अधिकारी १५४, होमगार्ड जवान ५०, नवी मुंबई महानगरपालिका कर्मचारी वाहनासह-११, आरोग्य विभाग ४, विविध अग्निशमन केंद्रांचे कर्मचारी-वाहनांसह, पोलीस BDS पथक, TDRF टीम-वाहनासह, कल्याण-डोंबिवली मनपाचे कर्मचारी-वाहनासह व उल्हासनगर महापालिकेचे कर्मचारी, तसेच पी. एम. श्री स्कूलचे १८३५ विद्यार्थी व कर्मचारी सहभागी झाले. याशिवाय सुमारे २५०० स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सदर कार्यक्रमास मा. विजय जाधव, उपनियंत्रक, नागरी संरक्षण, तसेच कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
मॉकड्रीलच्या यशस्वी आयोजनात चारही उपमुख्य क्षेत्ररक्षक, १५ हून अधिक विभागीय क्षेत्ररक्षक आणि त्यांच्या उपविभागीय क्षेत्ररक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदवत महत्त्वपूर्ण योगदान दिले.
प्रात्यक्षिकानंतर मा. श्री.संजय केळकर, मुख्य क्षेञरक्षक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत नागरी संरक्षण दलाच्या सर्व पथकांचे कौतुक केले. “आपत्ती व्यवस्थापनात अशा प्रकारच्या मॉकड्रीलमुळे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होते आणि प्रत्यक्ष संकटसमयी सज्जता वाढते,” असे त्यांनी सांगितले. सर्व सहभागी पथकांचे आभार मानून त्यांनी मॉकड्रीलच्या यशाबद्दल अभिनंदन केले.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली, तद्नंतर ९ मिनिटाचे पथनाट्य मातृबेन काशिबाई पटेल महाविद्यालयाच्या नागरी संरक्षण स्वयंसेवकांनी सादर केले. ज्यामध्ये समाजातील सर्व घटकातील नागरिकांनी केंव्हा? कधी? कुठे? कसे? व कां? नागरी सरक्षण दलाच्या विविध पाठ्यक्रमांचे प्रशिक्षण घेणे महत्वाचे आहे हा अर्थबोध होतो. तर समारोप वंदे मातरमने करण्यात आला.
त्यानंतर सायं. ७.०० वाजता तुलशी दर्शन सोसायटी A-B विंग व परिसरात ब्लॅकआऊटचे महत्त्व पटवून देत प्रत्यक्ष ब्लॅकआऊटची (प्रकाशबंदी) अंमलबजावणी करण्यात आली.
नवीमुंबई मनपा आपत्ती व्यस्थापन विभागांनी सहभागी जवानांकरिता मुबलक प्रमाणात पाणी व अल्पोपहारासह सर्व व्यवस्था केली होती.
या यशस्वी मॉकड्रीलमुळे नागरिकांमध्ये आपत्कालीन परिस्थितीतील सज्जता, समन्वय आणि नागरी संरक्षणाबाबत जागरूकता अधिक दृढ झाली, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
— DCCD, NMC, Thane
सौजन्य- विश्वनाथ राऊत सर
No comments:
Post a Comment