कल्याण येथे नागरी संरक्षण दलाचा हवाई हल्ला प्रात्यक्षिक सराव उत्साहात संपन्न !!
दैनिक बातमीदार, कल्याण प्रतिनिधी : ता. १०, मा. श्री. विजय जाधव, उपनियंत्रक, नागरी संरक्षण दल, नवी मुंबई समूह, ठाणे यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली सुभाष मैदान, कल्याण (प.) येथे दि. ७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत हवाई हल्ला प्रात्यक्षिक सराव उत्साहात पार पडला.
या सरावावेळी सेवा ज्येष्ठ सहाय्यक उपनियंत्रक श्रीम. दीपा घरत, सहाय्यक उपनियंत्रक श्री.आननसिंग गढरी, तसेच उपमुख्य क्षेत्ररक्षक क्षेत्र-१ श्री. बिमल नथवाणी, क्षेत्र-२ श्री. रमेश गोरे आणि क्षेत्र-३ चे श्री. कमलेश श्रीवास्तव उपस्थित होते.
सरावाच्या पहिल्या दिवशी विभागीय क्षेत्ररक्षक श्री. हनुमंत चौधरी यांनी ग्राउंड डेमोची प्रभावी तयारी करून घेतली. तसेच उपमुख्य क्षेत्ररक्षक श्री. बिमल नथवाणी यांनी विभागीय क्षेत्ररक्षक व उपविभागीय क्षेत्ररक्षकांकडून रिपोर्टिंग कशा पद्धतीने करावी याचा विशेष सराव करून घेतला. उपस्थित स्वयंसेवकांनी सांगितले की, “रिपोर्टिंगचा असा पद्धतशीर सराव यापूर्वी कधीच झाला नव्हता. आजच्या प्रशिक्षणातून आम्हाला नवीन ज्ञान मिळाले आणि त्याचे समाधान वाटले.”
या पहिल्या दिवसाच्या सरावात विभागीय क्षेत्ररक्षक हनुमंत चौधरी, भारती देशमुख, मनीष धुरी, लक्ष्मीकांत पोपळे, तसेच उपविभागीय क्षेत्ररक्षक नितीन कापसे, अनिल शेलार, संदीप मसकर, जयेश अहीरे, परेश पाठारे, मनोज झिमरे आणि स्वयंसेवक असे एकूण ३१ जण सहभागी झाले होते.
दि. ८ एप्रिल २०२६ रोजीही याच सुभाष मैदानावर मॉकड्रिल सराव होणार असून, गुरुवार दि. ९ एप्रिल २०२६ रोजी सर्व समावेशक नवीमुंबई समुह ठाणे जिल्यातील स्टेक होल्डर, शासकीय, निमशासकीय, NGO, महसुल विभाग, पोलिस यंञणा, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, जिल्हा क्रीडा विभागातील अधिकारी कर्मचारी इतर वेग-वेगळ्या आस्थापना व NCC, NSS, TDRF, होमगार्ड्स् आणि नागरी संरक्षण या First Responders (प्रथम प्रतिसादक) यांचा समावेश राहणार असुन, स्थानिक रहीवाश्यांनी घाबरुन जाऊ नये तथा कसलीही भिती बाळगु नये. हे सराव म्हणजे आपत्तीत किंवा दुर्घटनेच्यावेळी शासकीय यंञणा संकटाला तोंड देण्यासाठी किती व कशी सक्षम आहे हे तपासणे / पडताळणे याचाच एक भाग आहे.
सदरचे मॉकड्रील सराव माजी सरपंच स्व. गणपतशेठ फकीरजी नाईक मैदान, बोनकोडे गाव, सेक्टर ११, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे आपत्ती व्यवस्थापन विभाग, नवीमुंबई महानगर पालिका यांचे सहाय्य व समन्वयाने आयोजित करण्यात आली आहे.
या मॉकड्रील सरावामध्ये स्थानिक रहीवाशी व सामान्य नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, व इतिसाहासाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन नागरी संरक्षण दलाच्या वतीने श्री.विजय जाधव, उपनियंञक, यांचेकडुन करण्यात येत आहे.
सौजन्य/वृत्त - विश्वनाथ राऊत सर
No comments:
Post a Comment