Thursday, 9 April 2026

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !!

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !!

पेण (पंकज पाटील) - खारेपाट भागातील विठ्ठल नगर या गावात दरवर्षी प्रमाणे नाथसंप्रदायातील श्री.गोरक्षनाथ महाराजांचा जन्मोत्सव सोहळा सोमवार दि.१३ एप्रिल २०२६ रोजी चैत्र-वरूथिनी एकादशीच्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने अन् उत्साहात साजरा होणार आहे. 

यावेळी उत्सवात दोन दिवस चालणाऱ्या  किर्तनकार हभप प्राची मंदार व्यास (डोंबिवली) यांच्या कीर्तनाला हार्मोनियम साथ किशोर अनंत म्हात्रे (दिवा) तर तबलासाथ जितेंद्र अनंत म्हात्रे यांची लाभणार  आहे. सोमवारी ठीक दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी श्रींवर फुले उधळली जातील व त्यानंतर  दुपारी १:०० वा.महाप्रसादाची सुरुवात होईल. 

यावर्षी उत्सवातील महाप्रसाद - कै काशिनाथ मऱ्या पाटील यांच्या स्मरणार्थ नातू मितेश सुर्याजी पाटील व साहिल सुर्याजी पाटील (घोडाबंदर) यांच्यामार्फत दिला जाणार आहे. 

दुपारी १:३० वा. श्री अजित दिनकर ठाकूर यांच्या सौजन्याने भजन जोस्तनाई म्युझिकल ग्रुप गणपतीवाडी, पेण, गायिका- सौ.सायली विकी मानकवळे, पखवाज वादक श्री.विकी मानकवळे व सहकारी यांचा कार्यक्रम होईल. तसेच - कै. विठोबा महादू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सून- जयप्रभा प्रफुल्ल म्हात्रे (मा सभापती कृषी उत्पन्न बाजार समीती पेण) विठ्ठलनगर यांच्या सौजन्याने  सायं ०६:०० वा श्री सिध्दीविनयाक प्रासादिक संगित भजन मंडळ, शिंगणवट, गुरूवर्य संगितरत्न केशवराव बुवा पाटील कळवेकर, गुरूवर्य भजन सम्राट दत्तात्रेय बुवा ओढांगीकर यांचे शिष्य रायगड भूषण पुरस्कार व कोकण संगितरत्न पुरस्कार सन्मानित, संगित विशारद बुवा कु. ओंकार नंदकुमार पाटील (बोरी पेण) यांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्रौ १२:०० वा श्रींचा प्रदक्षिणा कार्यक्रम संपन्न  होईल. 

या उत्सवाच्या कार्यक्रमासाठी श्री. गोरक्षनाथ महिला मंडळ तसेच श्री गोरक्षनाथ क्रीडा मंडळ विठ्ठलनगर यांच्याकडून दरवर्षी आर्थिक मदत व संपुर्ण सहकार्य केले जाते. तसेच उत्सवाचे  व्यवस्थापन व नियोजन विठ्ठलनगर, घोडाबंदर, मळेघरवाडी, मंत्रीवाडी, जनवली, ठाकूरबेडी, पैराणकरवाडी, तामषीबंदर, बोरकरवाडी, बहिरामकोटक, लाखोले, म्हात्रे ठाकूरवाडी व सर्व बेडेकर मंडळी यांच्या सहकार्याने होते. 

तरी या उत्सवाला भाविकांनी मोठया संख्येने उपस्थित राहून श्री. दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे श्री गोरक्षनाथ संस्था, मु. विठ्ठल नगर  ता. पेण- रायगड यांनी कळविले आहे.

(बातमीदार संपर्क :9833127069)

No comments:

Post a Comment

'ग्रीन आशा' यशस्वी रित्या जेएनपीएत दाखल ; सुमारे १५ हजार टन एलपीजीची आयात !!

'ग्रीन आशा' यशस्वी रित्या जेएनपीएत दाखल ; सुमारे १५ हजार टन एलपीजीची आयात !! युद्ध सुरु असतानासुद्धा भारताची रणनीती ठरली यशस्वी. उरण...