Friday, 10 April 2026

अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची राष्ट्रीय स्तरावर दिमाखदार कामगिरी !!

अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची राष्ट्रीय स्तरावर दिमाखदार कामगिरी !!

वसई प्रतिनिधी/ पंकज चव्हाण

वसई येथील अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात एम.कॉम. च्या वर्गात शिकत असलेला विद्यार्थी हृषीकेश संजय मेहेर याने शरीरसौष्ठव क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.

२०२४ पासून ‘मिस्टर ऑलिम्पिया’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याचे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. या शैक्षणिक वर्षात त्याने विविध स्पर्धांमध्ये दमदार कामगिरीची नोंद केली. मुंबई विद्यापीठ आंतरविभागीय स्पर्धेत ‘बेस्ट फिजिक मेन्स’ (८० किलो गट) मध्ये रौप्यपदक पटकावले. ही स्पर्धा १३ फेब्रुवारी २०२६ रोजी डोंबिवली (पूर्व) येथील प्रगती महाविद्यालयात पार पडली.

तसेच, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी मालाड (पूर्व) येथे झालेल्या ‘मुंबई श्री’ ज्युनिअर बॉडीबिल्डिंग स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक मिळवला. पुढे पिंपरी-चिंचवड, पुणे येथे २८ ते ३० मार्चदरम्यान पार पडलेल्या ६३व्या आयबीबीएफ ज्युनिअर नॅशनल, मास्टर व फिजिक चॅलेंज स्पर्धेत त्याने ‘मेन्स क्लासिक (१८० से.मी. वरील उंची)’ आणि ‘मेन्स फिजिक (१८० से.मी. वरील उंची)’ या दोन्ही गटांत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच ८० किलो गटात एकूण तृतीय क्रमांक मिळवून चमकदार कामगिरी केली.

त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे कोषाध्यक्ष हसमुखभाई शहा यांच्या उपस्थितीत प्राचार्य डॉ अरविंद उबाळे यांच्या हस्ते महाविद्यालयातर्फे त्याचा सत्कार  व अभिनंदन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

शेळावे गणातील दुष्काळी प्रश्नांसाठी प्रशासनाकडे निवेदन !!

शेळावे गणातील दुष्काळी प्रश्नांसाठी प्रशासनाकडे निवेदन !! *पाणी, पीकनुकसान भरपाई, चारा व रोजगाराच्या तातडीच्या उपाययोजनांची मागणी* ...