महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला भेट !!
कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या विविध समस्या, कामगारांचे विविध प्रश्न, मागण्या तसेच महापालिका सफाई कामगारांसाठी राबवित असलेल्या योजना याबाबतचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेस भेट देऊन या सर्व संबधीत प्रश्नांवर महापालिका प्रशासनाशी सांगोपांग चर्चा केली. यासमयी महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त योगेश गोडसे, महापालिका सचिव किशोर शेळके, उपायुक्त वंदना गुळवे, घनकचरा विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे, कार्यकारी अभियंता प्रसाद सखदेव, संदीप तांबे, सुरेंद्र टेंगळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.दीपा शुक्ल, सहा.आयुक्त सुषमा मांडगे, इतर अधिकारी-कर्मचारी, विविध सफाई कामगार संघटनांचे अध्यक्ष-पदाधिकारी उपस्थित होते.
यासमयी सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी महापालिकेतर्फे सफाई कामगारांसाठी राबविल्या जाणा-या विविध योजना,उपक्रम याबाबत सहज-सुलभ शब्दात सादरीकरण केले. सफाई कामगारांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थासाठी महानगरपालिका राबवित असलेल्या विविध उपक्रमांबाबत, महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी महापालिका प्रशासनाची प्रशंसा केली. महापालिकेत २५ वर्ष सेवा झालेल्या सफाई कामगारांची महानगरपालिकेने यादी तयार करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेतंर्गत त्यांना घरांचा लाभ मिळवून द्यावा, सफाई कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी, निवेदनासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करावा तसेच सदर बैठकीत उपस्थित झालेल्या सफाई कर्मचा-यांचा समस्यांबाबत प्रशासनाने १५ दिवसात अहवाल सादर करावा असे निर्देश मुकेश सारवान यांनी बैठकीअंती महापालिका प्रशासनास दिले.
सफाई कर्मचा-यांच्या समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासन कटीबध्द आहे,असे व्यक्तव्य सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी बैठकीच्या वेळी सांगितले.
No comments:
Post a Comment