Thursday, 21 May 2026

वडिलांनी मोबाईल काढून घेतल्याने मुलाची आत्महत्या !!

वडिलांनी मोबाईल काढून घेतल्याने मुलाची आत्महत्या !!

कल्याण, संदीप शेंडगे : मोहने येथील एनआरसी शाळेत शिकत असलेल्या नववीतील विद्यार्थ्यांनी तणनाशक पिऊन आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असून मुलाला घरात सतत मोबाईलवर गेम खेळण्याच्या सवयीमुळे वडिलांनी मुलाचा मोबाईल काही वेळासांसाठी काढून घेतला होता मात्र या छोट्याशा कारणाने एका निरागस लेकराने आपलं आयुष्यच संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याची हृदयद्रावक घटना मोहिली गावात घडली आहे.

कु. कार्तिक दिनेश वायले वय १४ या अल्पवयीन मुलाने घरातील तणनाशक प्राशन करून आत्महत्या केली. तातडीने मुलाला खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले परंतु तणनाशक संपूर्ण शरीरात भिनल्याने त्याची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली या घटनेने पालकांनी चिंता व्यक्त केली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाईल गेमच्या वाढत्या व्यसनामुळे मुलांचे मानसिक संतुलन बिघडत असल्याची चिंता या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आली आहे. पालकांनी मुलांशी संवाद वाढवणे, त्यांना वेळ देणे आणि मोबाईलच्या वापराबाबत समजूतदारपणे मुलांना मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

एका छोट्याशा हट्टाने एका घरातील चिराग कायमचा विझला… आणि मागे राहिल्या फक्त आठवणी, अश्रू आणि कधीही न भरून येणारी पोकळी.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पालिकेच्या अ प्रभागात अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई !!

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पालिकेच्या अ प्रभागात अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई !! कल्याण, संदीप शेंडगे : पालिकेच्या अ प्र...