Monday, 18 May 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ७ जून रोजी कल्याण-डोंबिवलीत सायकल रॅली !!

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ७ जून रोजी कल्याण-डोंबिवलीत सायकल रॅली !!

** सायकल चालवा, शहर वाचवा चा नारा

कल्याण, संदीप शेंडगे : जागतिक पर्यावरण दिन आणि आंतरराष्ट्रीय सायकल दिनानिमित्त ७ जून रोजी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, पोलीस विभाग आणि बिर्ला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली सकाळी ६.३० वाजता कल्याण आणि डोंबिवली येथून एकाच वेळी सुरू होणार असून पर्यावरण संरक्षण, निरोगी जीवनशैली आणि सुरक्षित वाहतुकीचा संदेश नागरिकांना दिला जाणार आहे.

कल्याण येथे बी. के. बिर्ला महाविद्यालयातून रॅलीला सुरुवात होणार असून महापौर हर्षाली चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन होईल. तर डोंबिवली येथे सावळाराम महाराज क्रीडा संकुलातून रॅलीला प्रारंभ होणार आहे. उपमहापौर राहुल दामले आणि सभागृह नेते वरुण पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ केला जाणार आहे.

“सायकल चालवा, शहर वाचवा” या संदेशातून प्रदूषण, वाहतूक कोंडी आणि पर्यावरणीय समस्यांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. महापालिकेकडून गृहनिर्माण संस्थांमध्ये कचरा व्यवस्थापन, सौर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि अग्निसुरक्षा यांसारख्या विषयांवरही मार्गदर्शन केले जात आहे.

गुगल फॉर्मद्वारे नोंदणी करणाऱ्या सहभागी सायकलपटूंना टी-शर्ट, पदक आणि अल्पोपहार देण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

मोहने परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात रिक्षा युनियन आक्रमक !!

मोहने परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात रिक्षा युनियन आक्रमक !! *रस्त्याच्या दुतर्फा हातगाड्यांचा विळखा; नागरिक आणि रिक्षाचालक त्रस्त* ...