Monday, 18 May 2026

औषध विक्रेत्यांचा देशव्यापी बंद: २० मे रोजी साडे बारा लाख दुकाने बंद राहणार !!

औषध विक्रेत्यांचा देशव्यापी बंद: २० मे रोजी साडे बारा लाख दुकाने बंद राहणार !!

कल्याण, प्रतिनिधी :
ऑल इंडिया केमिकल अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे बेकादेशीर औषध विक्री, नियमबाह्य दिले जाणारे डिस्काउंट आणि जीएसआर अधिसूचना रद्दबातल करण्याच्या मागणीसाठी २० मे रोजी देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. देशातील साडे बारा लाख औषध विक्रेते या बंदमध्ये सहभागी होणार आहेत.

असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ उर्फ आप्पा शिंदे यांनी सांगितले की, केंद्र सरकारने इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन औषध विक्रीबाबत २०१८ मध्ये अधिसूचना जारी केली आहे, परंतु अद्याप त्याचे कायद्यात रूपांतर झाले नाही. याचा गैरफायदा घेऊन ऑनलाईन कंपन्या औषध विक्रीचा व्यवसाय करत आहेत.

शिंदे यांनी आरोप केला की, कार्पोरेट कंपन्या अव्यावसायिक स्पर्धा करून २० ते ५० टक्के डिस्काउंट देतात, ज्यामुळे छोटे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. सरकारने ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर अंतर्गत १६ टक्के नियंत्रित नफ्याची तरतुद मागे घ्यावी आणि औषध विक्रेत्यांना डॉक्टरने लिहिलेल्या औषधासारखी अनेक ब्रँड सबस्टिट्यूट औषधी देण्याचा अधिकार द्यावा अशी मागणी केली आहे.

केंद्र सरकारने मागण्यांची दखल न घेतल्यास बेमुदत बंद पुकारण्यात येईल आणि मेडिकल दुकानांच्या चाव्या केंद्र सरकारला पाठवण्यात येतील असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.

यावेळी केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख, संघटनेचे सचिव सुरेश भट,केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे ठाणे जिल्हा कोषाध्यक्ष ॲड. गणेश शेळके उपस्थित होते. औषध विक्रेत्यांनी आपल्या दुकानाच्या दर्शनी भागात बंदची भित्तीपत्रके चिटकवली आहेत.

No comments:

Post a Comment

मोहने परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात रिक्षा युनियन आक्रमक !!

मोहने परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात रिक्षा युनियन आक्रमक !! *रस्त्याच्या दुतर्फा हातगाड्यांचा विळखा; नागरिक आणि रिक्षाचालक त्रस्त* ...