Thursday, 21 May 2026

कॉंग्रेसच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी डॉ. मनीष पाटील ; आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले अभिनंदन !

कॉंग्रेसच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी डॉ. मनीष पाटील ; आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले अभिनंदन !

उरण दि २१, (विठ्ठल ममताबादे) :
 रायगड जिल्हा हा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची पावन भूमी आहे. राजकारणातील सारीपटात कॉंग्रेसने वरिष्ठ पातळीवर दक्षिण रायगड आणि उत्तर रायगड असे रायगड जिल्ह्याचे दोन तुकडे केले आहेत. त्यामुळे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ. मनीष पाटील आणि दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्ष म्हणून राजाभाऊ ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. मनीष पाटील हे सध्या रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. त्यामुळे कॉंग्रेसचे रायगडचे मावळते जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी 'सुखकर्ता' बंगल्यावर डॉ. मनीष पाटील यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.डॉ मनीष पाटील,राजाभाऊ ठाकूर यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पालिकेच्या अ प्रभागात अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई !!

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पालिकेच्या अ प्रभागात अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई !! कल्याण, संदीप शेंडगे : पालिकेच्या अ प्र...