साहित्यिक आणि समाज सेवकांचा कोमसाप उरणचा मधुबन कट्टा प्रेरणास्थान - नागेंद्र म्हात्रे
उरण दि १८, (विठ्ठल ममताबादे) : साहित्यिकांच्या आणि समाज सेवकांच्या कार्याचा गौरव करून सतत साडे दहा वर्षे कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप )मधुबन कट्ट्यावर नवोदितांना प्रेरणा देण्याचे कार्य अभिनंदनीय आहे,असे विचार कोमनादेवी संस्थेचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांनी अध्यक्षीय भाषणात विचार मांडले. ते कट्ट्याच्या १२७ व्या कार्यक्रमात बोलत होते.यावेळी साहित्यरत्न प्रा.एल.बी.पाटील, चंद्रकांत मुकादम,प्रकाश म्हात्रे,बाजी घरत,भुवनेश पाटील,दत्ता निळवर्ण, रमाकांत घरत, अनंत पाटील,सुरेश गायकवाड ,मिना बिस्ट,श्रुती म्हात्रे इत्यादीची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समाजसेवक रमाकांत जयराम घरत, सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र म्हात्रे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पत्रकार विठ्ठल ममताबदे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्ता विशेष सन्मानाने गौरविण्यात आले. शाखाध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे, मधुबनचे अध्यक्ष राम म्हात्रे,सचिव अजय शिवकर, केंद्रीय सचिव संजय होळकर यांनी कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.सूत्रसंचालन
शिवप्रताप पंडित यांनी केले.
या प्रसंगी "सागर किनारा "या विषयावर कविसंमेलन घेण्यात आले, त्यावेळी बालकवी अनुप शिवकर, भरत पाटील,अनिल भोईर, संपदा ठाकूर, संजीव पाटील, न.ग. पाटील, मारुती तांबे, नामदेव पाटील अजय शिवकर, भालचंद्र म्हात्रे, संग्राम तोगरे, सुरेश मेस्त्री इ.१६ कवींनी कविता सादर केल्या.होळकर संजय यांनी आभार मानले
No comments:
Post a Comment