Monday, 18 May 2026

चिर्ले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कॉंग्रेसचे राजेश पाटील बिनविरोध !

चिर्ले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कॉंग्रेसचे राजेश पाटील बिनविरोध !

** आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले अभिनंदन!

उरण दि १८, (विठ्ठल ममताबादे) ::उरण तालुक्यातील चिर्ले ग्रुपग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कॉंग्रेसचे राजेश ज्ञानेश्वर पाटील हे सोमवारी (ता. १८) बिनविरोध निवडून आले. गावठाण, जांभूळपाडा आणि चिर्ले अशा तीन गावांची मिळून चिर्ले ग्रामपंचायत आहे. ते मूळचे जांभूळपाडा गावचे आहेत. कॉंग्रेसचे ते गाव अध्यक्ष आहेत. राजेश पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांची  बॅंजोच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत, जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनीष पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

चिर्ले ग्रामपंचायतीचे सरपंच सुधाकर पाटील (काका पाटील), तसेच चिर्ले ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गणेश पाटील, समीर मढवी, विनोद पाटील, प्रफुल्ल माळी आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसचा उपसरपंच झाल्याने फटाक्यांच्या आतषबाजीत जांभूळपाडा ग्रामस्थांनी उपसरपंचांचे स्वागत केले

No comments:

Post a Comment

मोहने परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात रिक्षा युनियन आक्रमक !!

मोहने परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात रिक्षा युनियन आक्रमक !! *रस्त्याच्या दुतर्फा हातगाड्यांचा विळखा; नागरिक आणि रिक्षाचालक त्रस्त* ...