** २० मेच्या मेडिकल संपाला नागरिकांचा तीव्र विरोध !!
*“संपात सहभागी होणाऱ्या मेडिकल दुकानांचे परवाने रद्द करा” — नागरिकांची मागणी*
संदीप शेंडगे.....
कल्याण : २० मे रोजी पुकारण्यात आलेल्या ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनच्या देशातील सर्व मेडिकल दुकानांच्या संपाला नागरिकांकडून तीव्र विरोध व्यक्त करण्यात येत असून, अत्यावश्यक सेवेमध्ये येणाऱ्या मेडिकल सेवा बंद ठेवून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणे अयोग्य असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. संपात सहभागी होणाऱ्या मेडिकल दुकानांवर शासनाने कठोर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सध्या अमेरिका आणि इराण युद्ध सुरू असून त्याचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला असून पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे महागाईने उच्चांक गाठला असून नागरिक कठीण परिस्थितीला सामोरे जात आहेत त्यातच मेडिकल असोसिएशनने बंदची हाक दिल्याने सर्व सामान्य नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यातील शासकीय आणि खाजगी रुग्णालयात आवश्यक तेवढा सर्वसामान्य पुरेल इतका मेडिकलचा साठा उपलब्ध नाही याचाच परिणाम रुग्णांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात हलवण्याचे शक्यता वर्तविण्यात येत आहे. वर्षाचे ३६५ दिवस मोठ्या प्रमाणात नफा कमावणारे अनेक मेडिकल चालक आता स्वतःच्या आर्थिक हितासाठी संपाचा मार्ग अवलंबत असून, रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार करत आहेत. मूळ किमतीपेक्षा दोनशे ते तीनशे टक्के जादा दराने औषध विक्री होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मेडिकल औषध निर्माण कंपन्या मेडिकल दुकानदारांना मोठ्या प्रमाणात एमआरपी पेक्षा जास्त किंमत ठेवून औषध विक्री करायला सांगतात औषधांवर लिहिलेली किंमत पाहून ग्राहक असेल ती किंमत देऊन औषधे खरेदी करतो.
हे मेडिकल दुकानदार स्वस्त व परिणामकारक असलेल्या जेनेरिक औषधांना सुरुवातीपासून विरोध करीत आले आहेत. आजही अनेक मेडिकल दुकानांमध्ये जाणीवपूर्वक जेनेरिक औषधे उपलब्ध करून दिली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सामान्य रुग्णांना महागडी ब्रँडेड औषधे खरेदी करण्याशिवाय पर्याय राहत नाही.
डायबिटीस, बीपी, पेनकिलर यांसारख्या नियमित लागणाऱ्या औषधांमधून मोठ्या प्रमाणावर नफा कमावला जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. डॉक्टरने लिहून दिलेली औषधे घ्यावी लागत असल्याने मेडिकल चालक मनमानी करत आहेत,” अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली.
प्रत्येक मेडिकल दुकानांमध्ये फार्मासिस्ट नियुक्त करणे हा शासकीय नियम असतानाही हेच मेडिकल चालक फार्मासिस्ट ठेवत नाहीत तसेच एकाच लायसनवर परवाण्यावर अनेक मेडिकल दुकाने चालवली जातातकाही शहरी व ग्रामीण भागातील मेडिकल चालक हे अशिक्षित दहावी बारावी शिकलेले व्यक्ती दुकानात असतात मेडिकल डिग्री न घेतलेले म्हणजेच बी फार्मसी किंवा एम फार्मसी कोर्स न केलेले आढळून येतात.
काही ठिकाणी बंदी असलेल्या सेक्स वर्धक गोळ्या तसेच गर्भपाताच्या गोळ्यांचीही बेकायदेशीर विक्री होत असल्याचे गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात आले आहेत. याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
“अत्यावश्यक सेवा बंद ठेवून नागरिकांना त्रास देण्याचा अधिकार कोणालाही नाही. २० मेच्या संपाला नागरिकांचा पूर्ण विरोध असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करून जनतेला दिलासा द्यावा,” अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment