Friday, 1 May 2026

उरण नगरपरिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !

उरण नगरपरिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !

उरण दि १, (विठ्ठल ममताबादे) :
 कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून उरण नगरपरिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने मोफत रक्त, बीपी, शुगर, ईसीजी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. नितीन तिवारी, कामगार नेते संतोष पवार,  स्वप्नलता पाबळेकर,  माजी उपनगराध्यक्षा तथा नगरसेविका नाहीदा ठाकूर, नगरसेविका प्रमिला पवार, नगरसेविका प्रार्थना म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

जनतेचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी स्वतःचे आरोग्य धोक्यात टाकणाऱ्या सफाई कामगारांची आरोग्य तपासणी होणे गरजेचे आहे, या भावनेतून श्री पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, उरण नगरपरिषद आणि म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर घेण्यात आले. 

मे सुश्रुषा हार्ट केअर सेंटर, पनवेल व नेक्स व्हिजन आय हॉस्पिटल, द्रोणागिरी-उरण यांच्या सहकार्याने या शिबिरात हृदय विकार तपासणी, ई.सी.जी., डोळे तपासणी, शुगर तपासणी, बी.पी. तपासणी तसेच लिपिड प्रोफाइल, LFT, KFT, CBC, Hba1c सह संपूर्ण रक्त तपासणी मोफत करण्यात आली.

श्री पॅथॉलॉजी लॅबोरेटरीच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त हे विशेष शिबीर दि. ०१ मे २०२६ रोजी सकाळी १०:००ते दुपारी २:०० या वेळेत उरण नगरपरिषद कार्यालय येथे घेण्यात आले. 

हे शिबीर यशस्वी करण्यासाठी श्री पॅथॉलॉजीचा स्टाफ तसेच म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी  मधुकर भोईर, कोषाध्यक्ष माधव सिद्धेश्वरे यांनी विशेष मेहनत घेतली.

 भावनाताई घाणेकर नगराध्यक्षा ,संतोष पवार कार्याध्यक्ष, म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन, डॉ. नितीन तिवारी, डॉ. नयना पाटील-ठाकूर (Medical Director) आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

मुंबईतील मृत्यूनंतर उरण मध्ये कलिंगड विक्रीला फटका ; उरण मधील बाजारावर परिणाम !!

मुंबईतील मृत्यूनंतर उरण मध्ये कलिंगड विक्रीला फटका ;  उरण मधील बाजारावर परिणाम !! ** व्यापाऱ्यांना नुकसान होण्याची भीती. उरण दि ...