Friday, 1 May 2026

बल्याणी येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त भव्य कामगार मेळावा संपन्न !!

बल्याणी येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त भव्य कामगार मेळावा संपन्न !!

** असंघटित कामगारांसाठी आरोग्य शिबिराच्या आयोजन

बल्याणी (टिटवाळा), संदीप शेंडगे : महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून बल्याणी येथे भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास कामगारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. असंघटित घरेलू कामगारांसाठी असलेल्या विविध योजना सवलती कागदपत्रांची तातडीने पूर्तता करून लाभार्थ्यांना तात्काळ त्याचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांनी उपस्थित कामगारांना दिले.

कामगारांना शुभेच्छा देत कामगारांसाठी विविध योजना राज्य सरकार देत असून कामगारांनी त्याचा फायदा घेण्याचे आवाहन माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले. तसेच कामगारांसाठी राज्य सरकार विविध योजना विविध कार्यक्रम राबवीत असते त्याचा फायदा नागरिकांनी घ्यावा तसेच त्या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी फॉर्म भरून विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन माझे आमदार नरेंद्र पवार यांनी केले

यावेळी असंघटित कामगारांकडून महिला व पुरुष यांच्याकडून मोठ्या प्रमाणात फॉर्म भरून घेण्यात आले तसेच त्यांना लवकरात लवकर लाभ मिळवून देण्यात येईल असे महाराष्ट्र असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष गौतम बर्डे यांनी सांगितले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर, माजी आमदार नरेंद्र पवार, गटनेते उमेश बोरगावकर, विभाग प्रमुख लक्ष्मण तरे, नगरसेवक राहुल कोट, माजी नगरसेवक दया शेट्टी, माजी नगरसेविका शारदा गायकवाड, उपविभाग प्रमुख विजय पाटील, संतोष दळवी, श्रावण पाटील, सुबाराव खराडे, मनोज पाटील, विवेक शिंदे, निलेश तिवारी, प्रशांत सोनारे, सिद्धार्थ गोडांबे, रंजना भांबरे, नसरीन सिद्दिकी, शहिदा शेख, मीना सरोज, नाना पवार आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

या भव्य मेळाव्याचे आयोजन नगरसेविका तेजश्री गायकवाड यांनी केले असून संदीप गायकवाड, हेमंत गायकवाड व गौतम बर्डे यांनी मेळावा यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.

No comments:

Post a Comment

मुंबईतील मृत्यूनंतर उरण मध्ये कलिंगड विक्रीला फटका ; उरण मधील बाजारावर परिणाम !!

मुंबईतील मृत्यूनंतर उरण मध्ये कलिंगड विक्रीला फटका ;  उरण मधील बाजारावर परिणाम !! ** व्यापाऱ्यांना नुकसान होण्याची भीती. उरण दि ...