ईश्वरपूरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त अभूतपूर्व जनसागर !!
ईश्वरपूर, प्रतिनिधी :
ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य शोभायात्रा व जाहीर सभेला उपस्थित राहून समाजबांधवांशी संवाद साधला. हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या समाजबांधव, माता-भगिनी आणि युवकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण ईश्वरपूर नगरी अहिल्यामातेच्या जयघोषाने दुमदुमून गेली.
पुण्यश्लोक अहिल्यामाता यांचे कार्य, त्याग, न्यायनिष्ठा आणि लोककल्याणकारी विचार हे आजही समाजाला दिशा देणारे आहेत. इस्लामपूरचे 'ईश्वरपूर' आणि अहमदनगरचे 'अहिल्यानगर' झाल्यानंतर स्वाभिमानी ईश्वरपूरच्या भूमीत साजरी झालेली ही जयंती केवळ उत्सव नव्हे, तर समाजशक्ती, स्वाभिमान आणि संघटनशक्तीचे विराट दर्शन ठरली.अहिल्यामातेचे भव्य स्मारक कोणत्याही सत्ताधाऱ्यांच्या उपकारातून नव्हे, तर समाजबांधव आणि माता-भगिनींच्या लोकवर्गणीतून स्वाभिमानाने उभे राहिले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यामाता यांच्या जन्मभूमी चौंडीच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारने मंजूर केलेला ₹१००० कोटींचा विकास आराखडा हा ऐतिहासिक निर्णय असून आचारसंहिता संपताच त्यावरील कामांना गती मिळणार आहे.धनगर समाजाच्या श्रद्धास्थानांच्या विकासासाठी प्रत्येक 'क' वर्ग तीर्थक्षेत्राला ₹५ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प करण्यात आला असून आरेवाडी देवस्थानचा ₹१५० कोटींचा विकास आराखडाही शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
मेंढपाळ बांधवांवर होणारा अन्याय, दडपशाही आणि जुलूमशाही आता सहन केली जाणार नाही. संविधानाने दिलेल्या हक्कांसाठी, एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आणि धनगर समाजाच्या न्याय्य अधिकारांसाठी आमचा संघर्ष अधिक तीव्रतेने सुरू राहील. ही पिढी केवळ तमाशा पाहण्यासाठी नाही, तर इतिहास घडवण्यासाठी आणि समाजाचा स्वाभिमान प्रस्थापित करण्यासाठी मैदानात उतरली आहे.
यावेळी राज्यसभा खासदार रामराव वडकुते, ज्येष्ठ नेते डॉ. अण्णासाहेब डांगे, माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत, आमदार सत्यजित देशमुख, सम्राटबाबा महाडिक, माजी आमदार भगवान आप्पा साळुंखे तसेच महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध देवस्थानांचे संत, महंत, पुजारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो समाजबांधव उपस्थित होते.
शब्दांकन - विलासराव कोळेकर सर
No comments:
Post a Comment